राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिलात सूट देण्यासाठीचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता

मुंबई । राज्यात लॉकडाऊनच्या काळात अव्वाच्यासव्वा विजेची बिलं आल्याने अनेकांना फटका बसला होता. राज्यभरात वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली होती. काही जणांना अंदाजे तर काही जणांना चुकीची बिलं पाठवल्याने मोठ्या प्रमाणात लोकांकडून असंतोष व्यक्त होत होता. सुधारित बिलं पाठवण्याची मागणी होत होती. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिलात सूट देण्यासाठीचा प्रस्ताव येण्याची दाट … Read more

वीज बिलांची तपासणी केल्यास देय रकमेत वाढ झाल्याचं आढळलं नाही- उर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई । कोरोना लॉकडाऊन काळानंतर महावितरण आणि राज्यातील अन्य काही वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं देण्यात आली. यासंदर्भात वीज ग्राहकांमध्ये सध्या तीव्र नाराजी दिसून येत आहे. पण, वीज बिलांची तपासणी केल्यास मुळात वीज बिलांच्या देय रकमेचा आकडा वाढवलेला नाही, असं मत खुद्द राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडलं आहे. यावेळी त्यांनी … Read more

वाढीव वीज बिलाचा एकनाथ खडसेंनाही बसला ‘शॉक’; महावितरणने पाठवलं १ लाख ४ हजार रुपयांचं बिल

जळगाव । महावितरणने वीज ग्राहकांना पाठवलेल्या वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’ राजकीय नेत्यांना सुद्धा बसला आहे. भाजपा नेते एकनाथ खडसे यांना जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरासाठी १ लाख ४ हजार रुपयांचं बिल पाठवण्यात आलं आहे. एप्रिल ते जुलै अशा ४ महिन्यांचं हे बिल आहे. एकनाथ खडसे यांनी वापर कमी असूनही इतकं वीज बिल आल्याने आश्चर्य व्यक्त केलं … Read more

बापरे !!! शेतकऱ्याला विजेचे बिल हजार , बाराशे रुपये नाही तर तब्ब्ल आले ६४ लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या पाच महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घेतला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी पासून विजेचे वाढते बिल हि सर्वांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक तक्रार दाखल झाल्या आहेत. पण त्यावर अजून ठोस कारवाई झाली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक सर्वसामन्य शेतकऱ्याला विजेचे बिल हे तब्ब्ल ६४ लाख आले आहे. … Read more

आपला स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना आता ITR मध्ये द्यावी लागणार ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इनकम टॅक्स विभागाने सूचना दिली आहे की AY 2020-21 साठी आयटीआर फॉर्म 3 हा e ई-फाईलिंगसाठी उपलब्ध आहे. ते एक्सेल किंवा जावामध्ये डाउनलोड करता येतील. आयटीआर फॉर्म 3 हा व्यावसायिकांसाठी असल्याचे टॅक्स एक्सपर्टचे म्हणणे आहे. यावेळी फॉर्ममध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्यासाठी … Read more

वीज ग्राहकांना दिलासा! वाढीव बिलांत २० ते ३० टक्के सूट मिळण्याची शक्यता

मुंबई । लॉकडाऊन काळातील वीजवापराच्या अव्वाच्या सव्वा बिलांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. राज्यभरातील वीज ग्राहकांना या वाढीव वीज बिलाचा फटका बसलाय. यामुळे जनतेत आक्रोश आहे. यासंदर्भात राज्य सरकारची वीज नियामक मंडळासोबत बैठक होत असून यातून ग्राहकांना २० ते ३० टक्के सूट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात एकूण 73 लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. ९३ … Read more

अव्वाच्यासवा वीजबील आकारणीला तात्काळ चाप लावा! राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई । राज्यात भरमसाठ पाठविण्यात आलेल्या वीजबिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक आक्रमक झाली आहे. हा प्रश्न त्वरीत सोडविण्यात यावा, अशी मागणी मनसेनेने केली आहे. याबाबत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहीले आहे. अव्वाच्यासवा वीज बील आकारणीला तात्काळ चाप बसायलाच हवा. वीजबिलात तात्काळ सूट द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली … Read more

‘बेस्ट’चा ग्राहकांना मोठा दिलासा! वीज बिलाची जास्तीची रक्कम व्याजासहित परत करणार

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिलांमुळे आर्थिक बोजा पडलेल्या सामान्य ग्राहकांना ‘बेस्ट’ने मोठा दिलासा दिला आहे. या ग्राहकांकडून आकारण्यात आलेली वीज बिलाची जास्तीची रक्कम त्यांना व्याजासहित परत केली जाईल. वसूल केलेली अतिरिक्त रक्कम संबंधित ग्राहकाच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे ‘बेस्ट’कडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. … Read more

खुशखबर! विजेचे दर पुढच्या ५ वर्षांसाठी कमी होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी खुशखबर आहे. पुढील ५ वर्षांसाठी विजेचे दर कमी होणार आहेत. वीज दरात १० ते १५ टक्के कपात होणार आहे. या निर्णयाचा घरघुती, औद्योगिक, आणि शेती वर्गाला लाभ मिळणार आहे. राज्य वीज नियामक आयोग लवकरच याबाबत आदेश देणार आहे. येत्या १ एप्रिलपासून विज दरात कपात केली जाणार आहे. या … Read more

वस्त्रोद्योगाला मिळणार वीज बिलात सबसिडी- ऊर्जामंत्री नितीन राऊत

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर वस्त्रोद्योगासाठी वीज बिलात सबसिडी देण्यासंदर्भात अहवाल तयार करून वस्त्रोद्योग विभागाकडून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून घेण्यासाठी ऊर्जा विभाग प्रयत्न करेल असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. विधानभवनातील समिती कक्षामध्ये सूतगिरण्या व यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. वस्त्रोद्योगाला वीजबिलात प्रति युनिट ३ रुपये सवलत मिळावी, इतर राज्यांप्रमाणे वस्त्रोद्योगासाठी वीज शुल्क … Read more