कचरा वेचणाऱ्या महिलांच्या घराचे वीजबिल आले १५ हजार रुपये

सांगली | कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय गेले. हातावरचे पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न असताना महावितरणने भरमसाठी वाढीचे वीजबिल ग्राहकांना देऊन शॉक दिला. संजयनगर येथी झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना देखील असाच शॉक महावितरणने दिला आहे. याठिकाणी राहणाऱ्या कचरा वेचक महिलांच्या घरचे लाईट बिल हे १५ हजार रुपये आले आहे. हाताला काम नसल्याने ते भरायचे … Read more

वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक; ऊर्जामंत्री नितीन राऊतांविरोधात दिली पोलिसात तक्रार

मुंबई । वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसेने (MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढीव वीज बिलात नागरिकांना सवलत देण्यात येईल असे आश्वासन देऊन त्याची पूर्तता न केल्याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यासह ऊर्जा सचिव व बेस्ट महाव्यवस्थापक यांच्यावर आर्थिक फसवणुकीची तक्रार मनसेने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात केली आहे. मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष … Read more

सोमवारपर्यंत वीजबिल माफ करा, नाहीतर खळखट्याक! मनसेचे अल्टिमेटम

Raj Thackarey

मुंबई । वीजबिल माफी देता येणार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केल्यानंतर मनसेने वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज दिला. वीजबिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे जनतेत … Read more

आणि मग..Penguin Gang ची पार्टी सुरु! नितेश राणेंनी साधला निशाणा

मुंबई । लॉकडाऊन काळातील वीज बिलाच्या मुद्द्यावर भाजप आमदार नितेश राणे (bjp mla Nitesh Rane) यांनीही ट्वीट करत आघाडी सरकार आणि नाईटलाईवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडी सरकारने नाईटलाईफ जास्तच मनावर घेतली आहे. यामुळे इतकं वीज बिल लोकांना आलं की कोणीच भरणार नाही. मग काय अंधारच अंधार … Read more

परिवहन विभागाला एका मिनिटात हजार कोटी दिलेत; मग वीजबिल माफीसाठी का नाही?; बावनकुळेंचा सवाल

नागपूर । माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन वीजबिल माफीच्या मुद्द्यावरू राज्य सरकारवर सडकून टीका केली. वीजबिल माफीसाठी ५ हजार कोटी रुपये लागतील. पण सरकार पैसे देण्यास तयार नाही. अनिल परब यांच्या परिवहन खात्याला कामगारांच्या पगारासाठी एक हजार कोटींची गरज होती. त्यांना तात्काळ पैसे देण्यात आले. मग वीजबिल माफीचा … Read more

‘सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवाचं!’ राजू शेट्टींचे खुलं चॅलेंज

मुंबई । लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात चांगलंच राजकारण रंगले आहे. अशा वेळी लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलाचे पैसे (electricity bill ) आम्ही भरणार नाही. आता सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी आमच्याकडून वीज बिलाची वसूली करुनच दाखवावी, असे जाहीर आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetti) यांनी दिले. राज्य सरकारने वीज बिल माफ … Read more

महावितरणच्या थकबाकीचा आकडा ४७ हजार कोटींवर; ७ महिन्यांत ९८ लाख ग्राहकांनी १ रुपयाही भरला नाही

मुंबई । राज्यात वीज वितरित करणाऱ्या महावितरणला लॉकडाऊनचा (Lockdown) चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. महावितरणच्या (Mahavitran) तब्बल ९८ लाख ग्राहकांनी गेल्या ७ महिन्यांत वीज बिलाचा १ रुपयाही भरला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महावितरणच्या थकबाकीचा आकडा ४७ हजार कोटींवर पोहोचला आहे. (Electricity Bill) राज्यभरात महावितरणाचे अडीच कोटी वीज ग्राहक आहेत. सर्वाधिक १ कोटी … Read more

कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही! मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं भरा! ऊर्जामंत्र्यांचा वीज ग्राहकांना करंट

मुंबई । वाढीव वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केलं आहे. वीज वापरणारे जसे ग्राहक आहेत तसे महावितरणही ग्राहक आहे. महावितरणला बाहेरून वीज विकत … Read more

खरंच…1 सप्टेंबरपासून देशभरातील प्रत्येकाचे वीज बिल माफ होणार? या बातमीबद्दलचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाच्या युगात कोणतीही बातमी व्हायरल होते. सध्या जी बातमी व्हायरल होत आहे त्यात वीज बिल माफ करण्याविषयी म्हंटले गेले आहे. जर आपण 1 सप्टेंबरपासून वीज बिल माफीबद्दल कोणतीही बातमी वाचली किंवा ऐकली असेल तर ती पूर्णपणे चुकीची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. … Read more

खुशखबर! राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना वाढीव बिलात मिळणार सूट; राज्य सरकारचा प्रस्ताव तयार

मुंबई । लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वीज बिलाचा शॉक बसला. वाढीव आलेल्या वीजबिलाच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. ही बाब लक्षात घेत राज्य सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त असलेल्या राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार १ हजार कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. ऊर्जा विभागाने … Read more