कोरोना | माध्यमांनी ‘मोठा’ आणि लोकांच्या वागण्याने ‘भयानक’ केलेला विषाणू

सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा एखाद्या भूभागातील ४० ते ५० टक्के लोकांना त्या रोगाची बाधा होते. त्यातील २ ते ३ टक्के रुग्ण दगावतात. त्यामुळे ८० टक्केपेक्षा थोडे जास्तच रुग्ण हे सहा वर्षाखालील किंवा साठ वर्षावरील असतात. एकूण मृतांचे सरासरी वय हे सत्तर वर्षांपेक्षा थोडे जास्तच असते. या सर्व गोष्टी विचारात घेतल्यावर साडेसात अब्ज लोकसंख्येत २ लाख जणांचा मृत्यू ह्याची टक्केवारी किती?

सोलापूरमध्ये आठवड्याभरात दगावल्या 20 शेळ्या, रोगाचे निदान न झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीती

सोलापूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील 700- 800 लोकवस्ती असणार वसंतराव नाईक नगर गाव आहे. या गावात 90-95 कुटुंबांचं वास्तव्य आहे. इथल्या सर्वच कुटुंबांचा शेळीपालन हाच मुख्य व्यवसाय आहे.अशात मागच्या आठवड्याभरात गावातील 20 शेळ्या जुलाब होऊन दगावल्या आहेत. मात्र अद्याप शेळ्यांना नेमका कोणता रोग झाला आहे याच निदान झालं नाही. गरीबाची गाय म्हणून शेळीकडे पाहिलं … Read more

कोरोना विषाणूनंतरच्या जगातलं तापमान आणि पर्यावरण..!!

सर्व औद्योगिक प्रक्रियांत एक गोष्ट विकसित राष्ट्र स्वीकारत नाहीत आणि विकसनशील राष्ट्र साळसूदपणे कानाडोळा करतात. ती म्हणजे हवामान बदल आणि त्याचे जगावर होणारे परिणाम…

कोरोनाचा पर्यावरणावरील परिणाम

लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान गंगेचा प्रवाह हा संथपणे वाहताना दिसत असून त्यामध्ये विविध घातक रसायने,मृत शरीर,जनावरे यांचे अवशेष, मलमूत्र, सांडपाणी, जुने कपडे अथवा कचरा यांचे प्रमाण देखील कमी झालेले आहे.

पर्यावरणाच्या संपूर्ण अभ्यासासाठी दर्जेदार पुस्तक – पर्यावरण व परिस्थितिकी

पुस्तकांच्या दुनियेत | स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक खासियत असते. प्रत्येकजण आपली अभ्यासाची एक वेगळी शैली जोपासून असतो. पुस्तकं कोणतीही वाचली तरी नोट्स काढणं हे प्राधान्याने ठरलेलंच असतं. पण एखादं असं पुस्तक बाजारात आलं असेल की ज्यामध्ये विषयाच्या नोट्सच तुम्हाला काढून दिलेल्या असतील..? ते ही झकास रंगसंगती आणि चित्रांच्या माध्यमातून..!! ऐकायला थोडं वेगळं वाटलं … Read more

युवाशक्तीने पुनरुज्जीवीत झाली विदर्भ पर्यावरण परिषद

विदर्भ पर्यावरण परिषदेत तरुणाई मोठ्या उत्साहाने आणि जोमाने सहभागी झाली.

ऑस्ट्रेलियात 10,000 उंटांना ठार मारण्याचा आदेश; उंटांमुळे वाढत आहे ‘ग्लोबल वॉर्मिंग’, जाणून घ्या काय आहे प्रकरण

कॅनबेरा | दक्षिणेकडील ऑस्ट्रेलियात पाण्याच्या कमतरतेमुळे आणि जागतिक तापमान वाढीमुळे 10,000 जंगली उंटांना ठार मारण्याचा आदेश देण्यात आला आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या अनंगू पिटजंतजतारा यानकुनीत्जतजारा म्हणजे एपीवायच्या आदिवासी नेत्याने हा आदेश दिला आहे. या आदेशानुसार काही व्यावसायिक नेमबाज दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये हेलिकॉप्टरद्वारे 10,000 हून अधिक जंगली उंटांना मारणार आहेत. पाण्याची कमतरता डेली मेलच्या अहवालानुसार दक्षिणेकडील ऑस्ट्रेलियातील लोक सतत … Read more

अँमेझॉनमधील आगीमुळे एंडिज पर्वतरांगेतील हिमनग लागले वेगाने विरघळू

अँमेझॉन जंगल हे पृथ्वीचे फुफुस म्हणून ओळखलं जात. पृथ्वीवरील एकूण प्राणवायूपैकी २० टक्के उत्सर्जन अँमेझॉन जंगलातून होते. त्यामुळं पृथ्वीवर जैवविविधता टिकवून ठेवण्यास अँझोन जंगल मोलाची कामगिरी बजावत आलं आहे.मात्र अँमेझॉन खोऱ्यातील जंगलाला लागलेल्या भीषण आगीचा परिणाम आता पृथ्वीच्या हवामानावर होताना आता दिसत आहेत. अँमेझॉन जंगलापासून सुमारे २ हजार किलोमीटर दूर असलेल्या अमेरिकेच्या एंडिज पर्वतरांगेतील हिमनगांवर होत आहे. आगीमुळं निर्माण झालेल्या धुरातील काळ्या कार्बनमुळे येथील हिमनग वेगाने विरघळत असल्याची बाब एका संशोधनातून उघड झाली आहे.

पनवेल महापालिकेचं चाललंय काय ? प्रदूषणाविरुद्धची कार्यवाही अजूनही अहवालातच अडकलेली

वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांनी पनवेल शहराचं आणि त्यायोगे शहरांचा आसरा घेतलेल्या चाकरमान्यांचं आयुष्य दिवसेंदिवस जर्जर होत आहे. ३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पनवेल महापालिकेचा पर्यावरण अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामध्ये काही त्रुटी सापडल्याने सुधारणा करून नवीन अहवाल सादर होणे आवश्यक होते.

आणि बिबट्या चक्क संडासात लपला होता..

सातारा प्रतिनिधी | सकलेण मुलाणी पाटण तालुकयातील चाफळ जवळील डेरवण गावात बिबट्या चक्क संडासात येऊन बसल्याचं समोर आलंय. सायंकाली ७ वाजता घराच्या समोर असलेल्या अंगणातील संडासात बिबट्या बसला असल्याचं घर मालकाच्या लक्षात आलं. मालकाने तातडीने संडासचे दार बाहेरून बंद केले व वनक्षेत्रपाल याना फोन करून कल्पना दिली. वनखाते पिंजऱ्यासह तातडीने घटनास्थळी पोहचुन पिंजरा लावुन रात्री … Read more