दिलासादायक ! जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पुन्हा मिळणार सामान्य कर्ज, अवकाळीने वाया गेलेल्या द्राक्षबागांना सवलतीचा विचार

सांगली । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्जाव्यतिरिक्त देण्यात येणारे सामान्य कर्ज पुन्हा वर्षभरानंतर देण्याबाबतचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ज्या सोसायट्यांची वसुली 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, त्यांना सामान्य कर्जाचा लाभ मिळणार असल्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी स्पष्ट केले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीने पावसाने द्राक्षबागा वाया गेल्या आहेत. उध्वस्त झालेल्या बागायतदारांना दिलासा … Read more

महावितरणाची दिरंगाई बेतली जिवावर ! शेतात लोंबकळणाऱ्या वीज वाहिनीने घेतले तरुण शेतकऱ्यांचे प्राण

mseb

औरंगाबाद – शेतात जमिनीलगत लोंबकळणाऱ्या विद्यूत तारांना चिकटून एका तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी वैजापूर तालुक्यातील संवदगाव येथे उघडकीस आले. रामेश्वर बाळू रिठे (19) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी विज वितरण कंपनीचे वायरमन, कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या तिन जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक … Read more

स्वाभिमानी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा : बोरगाव पोलिसांकडून 100 हून अधिक शेतकरी ताब्यात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महावितरण कंपनीकडून कोणतीही लेखी पूर्वसूचना किंवा नोटीस न देता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागठाणे (ता.सातारा) येथून गणेशवाडी येथील महावितरण कार्यालयावर नागठाणे परीसरातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भव्य आक्रोश मोर्चा काढला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. सुमारे पाच … Read more

थकीत ऊस बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

सांगली । तासगाव व नागेवाडी साखर कारखान्यांची 17 कोटी रुपयांची थकीत ऊसबिले मिळावीत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी तहसीलदार कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढला. थकीत बिलांचे धनादेश घेतल्याशिवाय तहसील कार्यालयाच्या दारातून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांना घेतल्याने खासदार संजयकाका पाटील यांनी नरमाईची भूमिका घेत साखर कारखाना प्रशासनास 15 जानेवारीचे धनादेश देण्याचे आदेश … Read more

डाऊनी रोगामुळे द्राक्ष बागा उध्वस्त, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

सांगली प्रतिनिधी । तासगाव तालुक्यातील वायफळे येथील द्राक्षबागांवर डाऊनी या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. गावातील उदय उर्फ बबलू पाटील यांची सुपर व माणिकचमन या जातीची द्राक्षे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे पाटील यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. डाऊनीच्या प्रदर्भावामुळे अक्षरशः घड फेकून देण्याची वेळ पाटील यांच्यावर आली आहे. नैसर्गिक आघातामुळे या परिसरातील द्राक्षबागायतदार … Read more

शेतकऱ्यांने स्वतःला घेतले पुरून : वीज कनेक्शन तोडल्याने महावितरण विरोधात आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महावितरणकडून काही दिवसांपूर्वी शेती पंपाची वीज जोडणी तोडली आहे. त्याविरोधात पुसेसावळी परिसरातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करुन वीज जोडणी करण्याची मागणी केली होती. परंतु, या आंदोलनाची दखल न घेता उप अभियंता धर्मे यांनी वीज कनेक्शन कट करण्याचा धडाका सुरूच आहे. या विरोधात सुहास पिसाळ यांनी महावितरण कार्यालयासमोर जमिनीत गाडून घेत महावितरणकडून … Read more

‘या’ म्हशीसोबत सेल्फी काढण्यासाठी लागतेय शेतकर्‍यांची लाईन; एका दिवसात फस्त करते 15 लिटर दुध

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील तासगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा गजेंद्र नावाचा रेडा. या दीड टनाच्या रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनात भली मोठी गर्दी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून शिवार कृषी प्रदर्शन … Read more

“शेतकऱ्यांचे पैसे बुडवायचे धंदे बंद करा” – राजू शेट्टी

सांगली प्रतिनिधी ।  शेतकर्‍यांनी पिकवण्यापेक्षा विकायला शिकलं पाहिजे असं मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढले. ते क्रांतिसिंह नाना पाटील सेवाभावी संस्थेच्यावतीने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आयोजित केलेल्या शिवार कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. शेट्टी म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना जगात काय नव तंत्रज्ञान आले आहे. याची माहिती मिळाली तरच तो आधुनिक शेती पिकवू शकेल. … Read more

बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्याचा आनंद शेतकऱ्यांनी बैलांच्या सोबत गुलाल उधळून केला साजरा

सांगली प्रतिनिधी । महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीवर असणारी बंदी अखेर सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शेतकऱ्यांच्यामधून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. बैलगाडीवरील शर्यती ठेवण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वारंवार आंदोलन करण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी,संघटना शेतकरी संघटना,रयत क्रांती संघटना याच्यासह अनेक राजकीय पक्षाने देखील बैलगाडी शर्यतीवरील … Read more

बैलगाडी शर्यतींच्या परवानगीमुळे शेतकऱ्यांच्या घरी आज खरी दिवाळी : धनाजी शिंदे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आज न्याय मिळाला आहे. सुप्रीम कोर्ट, वकिल, राजकीय पक्ष, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह संघटनाचा आभार. अखिल भारतीय बैलगाडी संघटना झटत आहे, त्याला आज यश आले. बैलगाडी शर्यती सुरू झाल्याने गोवंश वाचणार आहे. आमच्या घरी आज खरी दिवाळी असल्याची भावना बैलगाडी मालक धनाजी शिंदे यांनी व्यक्त केली. सुप्रीम … Read more