यवतमाळ जिल्ह्यातील जेवली-मोरचंडीवासियांनी अनुभवला साप- मुंगसाच्या लढाईचा थरार

नुसत्या साप! नावाने भल्याभल्यांना कापरे भरते, अश्यात चवताळलेला नागासमोर आला तर आणि तोही मुंगसासी दोन हात करताना… अशा वेळी आपला थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही, आणि असा थरार पाहायला मिळणंही दुर्मिळच आहे, पण हा थरार यवतमाळ जिल्ह्यातील जेवली-मोरचंडी वासियांनी अनुभवला आणि आपल्या कॅमेऱ्यात टिपला सुद्धा.

डान्सबारच्या बाहेर पार्किंगच्या वादातून हाणामारी, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

उल्हासनगर मध्ये एका डान्सबारच्या बाहेर जोरदार हाणामारीचा प्रकार घडला आहे. डान्सबाहेरच्या बाहेर असलेल्या पार्किंगच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याचे समोर आले आहे. जवळपास ६ ते ७ जणांच्या टोळक्याने चौघांना जबर मारहाण केल्याचे उघड झाले आहे. हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.