डिजिटल लुटारूंपासून सावध रहा! कोरोना युगात वाढलाय सायबर फ्रॉड, डिजिटल लाइफमध्ये होणारी फसवणूक कशी टाळायची ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आपण सहसा आपल्या मित्रांद्वारे आणि माध्यमांद्वारे सायबर फसवणूकीबद्दल ऐकत असतो. तुमच्यातील अनेक जण या सायबर फसवणुकीला बळीही पडला असाल. देशातील कोरोना वातावरण दरम्यान, सायबर फसवणूकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. इंटरपोलने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाकाळा दरम्यान जगात सायबर फसवणूकीच्या घटनांमध्ये 350 पट वाढ झाली आहे. याचे मोठे कारण म्हणजे कोरोनरी कालावधीत सामाजिक अंतरामुळे, … Read more

जर आपणही फोन बँकिंग वापरत असाल तर सावधगिरी बाळगा! देशात वाढत आहेत सायबर फसवणूकीचे प्रकार

हॅलो महाराष्ट्र । जर आपण स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, नेट बँकिंग (Net Banking), डिजिटल बँकिंग (Digital Banking) वापरत असाल तर जरा सावधगिरी बाळगा. कारण नुकत्याच आलेल्या एनसीआरबीच्या NCRB (National Crime Record Bureau) अहवालानुसार 2019 साली भारतात सायबर फसवणूकीत (Cyber Fraud) 64 टक्क्यांनी वाढ झाली आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार 2019 साली सायबर गुन्ह्यांच्या 44,546 घटना घडल्या आहेत. … Read more

उद्यापासून बदलणार SBI च्या ATM मधून पैसे काढण्याचे नियम, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना 1 जानेवारी 2020 रोजी रात्रीच्या वेळी एटीएम फ्रॉड (ATM Fraud) टाळण्यासाठी ओटीपी आधारित एटीएम पैसे काढण्याची सुविधा सुरू केली. त्याअंतर्गत SBI च्या ATM मधून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत 10,000 रुपये किंवा त्याहून अधिकची रक्कम काढताना OTP … Read more

दामदुप्पट रक्कम देण्याचे अमीष दाखवून पंढरपुरात ११०० नागरिकांची आर्थिक फसवणूक

दामदुप्पट रक्कम देण्याचे अमीष दाखवून पंढरपूर परिसरातील सुमारे अकराशे गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे ही समोर आले आहे. त्यामुळे मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीच्या चार ठकसेनांवर पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद अझरुद्दीनवर २० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

मोहम्मद अझरूद्दीन याच्यासह तीन जणांवर ट्रॅव्हल्स कंपनीची २० लाख ९६ हजार ३११ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद शहाब मोहम्मद असे तक्रारदाराचे नाव असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्यातून मिळाली आहे.

‘रॉ’ चा अधिकारी सांगत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्याला अटक

देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉ चा अधिकारी असल्याच्या थापा मारून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या चोरट्याला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र जप्त केले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली. अभिजित पानसरे असे या चोरट्याचे नाव असून तो मूळचा नाशिकचा आहे.

बिट काॅईनच्या माध्यमातून दुप्पट रक्कम करण्याचे आमीष दाखवून लाखोंची फसवणूक, डाॅक्टर विरोधात गुन्हा दाखल

बिट काॅईन आभासी चलनातून पंढरपुरातील काही प्रतिष्ठीत लोकांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पंढरपुरातील एका डाॅक्टर विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचा बनाव करून व्यापाऱ्यास ६ लाखाचा गंडा, ७ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

एका उच्चशिक्षित तरुणीबरोबर लग्न लावण्याचा बनाव करत, बनावट पालक व खोटी कागदपत्रे तयार करून ७ जणांच्या टोळीने येथील एका कापड व्यापाऱ्याची सोने, चांदी आणि रोख रकमेसह ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कापड व्यापारी भैरूलाल शांतिलाल भंडारी (वय ३५, आझाद चौक) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.