जर आपणही फोन बँकिंग वापरत असाल तर सावधगिरी बाळगा! देशात वाढत आहेत सायबर फसवणूकीचे प्रकार

हॅलो महाराष्ट्र । जर आपण स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, नेट बँकिंग (Net Banking), डिजिटल बँकिंग (Digital Banking) वापरत असाल तर जरा सावधगिरी बाळगा. कारण नुकत्याच आलेल्या एनसीआरबीच्या NCRB (National Crime Record Bureau) अहवालानुसार 2019 साली भारतात सायबर फसवणूकीत (Cyber Fraud) 64 टक्क्यांनी वाढ झाली आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार 2019 साली सायबर गुन्ह्यांच्या 44,546 घटना घडल्या आहेत. तर 2018 मध्ये 28,248 नोंद झाली.

या राज्यात फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणे समोर आलेली आहेत
कर्नाटकमध्ये सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली (12,020) त्यानंतर उत्तर प्रदेश (11,416), महाराष्ट्र (4,967), तेलंगणा (2,691) आणि आसाम (2,231) . बहुतेक फसवणूक कॉम्प्युटर द्वारे होत आहेत. या अहवालानुसार 5.1 टक्के प्रकरणे ही लैंगिक हिंसाचाराशी संबंधित आहेत.

आकडेवारीनुसार महानगरांमध्ये एकूण 18,372 प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यामध्ये 81.9 टक्के वाढ झाली आहे. जास्तीत जास्त प्रकरणे (13,814) कॉम्प्युटरशी संबंधित गुन्हे (आयटी कायद्याच्या कलम 66) अंतर्गतही नोंदविले गेले आहे .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like