उद्यापासून बदलणार SBI च्या ATM मधून पैसे काढण्याचे नियम, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना 1 जानेवारी 2020 रोजी रात्रीच्या वेळी एटीएम फ्रॉड (ATM Fraud) टाळण्यासाठी ओटीपी आधारित एटीएम पैसे काढण्याची सुविधा सुरू केली. त्याअंतर्गत SBI च्या ATM मधून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत 10,000 रुपये किंवा त्याहून अधिकची रक्कम काढताना OTP आवश्यक असतो. आता बँकेने देशातील सर्व SBI ATM मधून 10,000 आणि अधिक रक्कम काढण्यासाठी 15 सप्टेंबर 2020 पासून OTP आधारित कॅश काढण्यास मुदतवाढ दिली आहे.

24×7 OTP-आधारित कॅश काढण्याची सुविधा सुरू केल्यामुळे SBI ने ATM मधून पैसे काढण्याच्या सुरक्षेची पातळी आणखी मजबूत केली आहे. दिवसभर या सुविधेची अंमलबजावणी सुरु केल्यामुळे आता SBI डेबिट कार्डधारक फसवणूक, अनधिकृत पैसे काढणे, कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग आणि इतरही अनेक धोके टाळण्यास सक्षम असतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like