धक्कादायक!! स्वतःच्या किडनीच्या सौद्यात फसगत झाल्याने युवकाने केली आत्महत्या  

अकोला प्रतिनिधी। आपल्या स्वतःच्या किडनीचा सौदा केल्यांनतर संबंधित डॉक्टर कडून फसवणूक झाल्याच्या दडपणात येऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. किडनी प्रत्यारोपणापूर्वीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डेव्हीड नामक डॉक्टरने या युवकाला २ लाख रुपयांनी फसवले होते. त्याच तणावात युवकाने आत्महत्या केल्याची माहिती सुरुवातीला कळाली आहे. अतुल अजाबराव मोहोड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून … Read more

इंग्रजी बोलून जोडप्याचा दुकानदारास गंडा

अहमदनगर प्रतिनिधी | इंग्रजीमध्ये फाडफाड बोलून एका दुकानदाराला महिलेने आणि त्याच्या सोबत आलेल्या पुरुषाने 36 हजार रुपयांना टोपी घातली आहे. हा सर्व प्रकार दुकानातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई येथील स्वाती कृषिसेवा केंद्र येथे हा सर्व प्रकार घडला असून कृषिसेवा केंद्राचे मालक उत्तम पटारे यांनी सोनई पोलिसात फिर्याद दिल्यावरून अनोळखी महिला आणि पुरुष … Read more

अवघ्या काही मिनिटांत शेतकर्‍याच्या खात्यावरचे ९१ हजार गायब, नक्की काय झालं वाचा…

अॅप्लीकेशन डाउनलोड करनं पडलं महागात नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख बातमी आहे नाशिकमधील सायबर क्राईमची. एका शेतकर्‍याला एक अॅप्लीकेशन डाउनलोड करनं चांगलंच महागात पडलंय. अवघ्या काही मिनिटात शेतकर्‍याच्या बँक खात्यातून 91 हजार रुपये गायब झालेत. नक्की काय घडलेय या शेतकर्‍याच्या बाबतीत पाहुयात. नाशिकच्या सातपुर भागातील शेतकरी रवी भंदुरे आपल्या मोबाइलवर रीचार्ज करायचा म्हणून गुगलपेचा आधार … Read more

सावधान…! बाजारात  बनावट नोटांचा सुळसुळाट

images

मुंबई प्रतिनिधी | बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला असून यामुळे ग्राहकांना आणि विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. या नोटा खेळण्यातल्या असून हुबेहूब नव्या नोटांसारख्याच दिसतात. लोअर परेल येथे दोन भाजी विक्रेत्यांना हा फटका बसला आहे. बाजारात अशा बनावट नोटा खपविणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. सायंकाळच्या वेळी कार्यालये सुटत असल्याने भाजीपाला व इतर … Read more

स्त्रीलंपट चोराला नागपुरात अटक

guilty

५ घटस्फोटित महिलांशी विवाह करून लाखो रुपयांना गंडवले नागपूर | प्रतिनिधी मेट्रीमोनिअल वेबसाईटवर खाते उघडून घटस्फोटीत महिलांना लग्नाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या आकाश अग्रवाल उर्फ अजय कुंभारे याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. घटस्फोटित महिलांच्या एकटेपणाचा फायदा उचलून मेट्रीमोनिअल वेबसाईटच्या माध्यमातून अनेक महिलांच्या संपत्तीला या इसमाने चुना लावल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले आहे. आजपर्यंत याने पाच स्त्रियांशी लग्न … Read more

धक्कादायक, केवळ २ तासात २१ देशांतून १२,००० ट्रान्झेक्शन्स करुन त्यांनी घातला काॅसमाॅस बँकेला गंडा

Cosmos bank fraud

मुंबई | काॅसमाॅस बँकेवर आजवरचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. केवळ २ तासात वेगवेगळ्या अशा २१ देशांतून एकूण १२,००० ट्रान्झेक्शन्स करुन महाराष्ट्रातील काॅसमाॅस बँकेला गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरण मोठे सायबर क्राइम असल्याचे काॅसमाॅस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे यांनी म्हटले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जगभरातील वेगवेगळ्या २१ देशात शनिवारी एकाच … Read more