नवजात शिशु आणि बालरुग्णांसाठी मिळणार नवीन पीडियाट्रिक व्हेंटिलेटर

pediatric ventilators

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) बालरुग्ण; त्याचबरोबर नवजात शिशुंसाठी आणखी 40 नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत ही खरेदी होणार असून, यानंतर उपकरणे घाटीकडे देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘घाटीमध्ये बालरुग्णांसाठी सध्या 20 स्वतंत्र व्हेंटिलेटर असून आणखी 40 नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध होणार … Read more

‘त्या’ बालकाचे नामकरण करून भारतीय समाजसेवा केंद्राच्या ताब्यात दिले

Social Sarvice

औरंगाबाद | चार दिवसांपूर्वी 4 वर्षाच्या दिव्यांग बालकाला घाटी परिसरात सोडून नातेवाईकांनी पळ काढल्याची घटना समोर आली होती. या चार दिवसात घाटीतील डाॅक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी या दिव्यांग बालकांचा सांभाळ केला. आणि मंगळवारी या बालकाला भारतीय समाजसेवा केंद्राच्या ताब्यात देण्यात आले. आणि या बालकाचे ‘साहिल’ असे नामकरण करण्यात आले आहे. घाटीत 4 दिवस दाखल असताना … Read more

धक्कादायक ! फुगे विकून घरी परतणाऱ्या बापलेकीचा वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

Accident

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबीयांवर रविवारी काळाने घाला घातला आहे. फुगे विकून घरी परतत असताना एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बापलेकीचा मृत्यू झाला आहे. फुगे विकून झाल्यानंतर वडील, मुलगी आणि मुलीचा मामा असे तिघेजण दुचाकीवरून खुलताबादवरून औरंगाबादच्या दिशेने येत होते. … Read more

औरंगाबादमध्ये साडूने मित्राच्या मदतीने केली कुख्यात गुंडाची हत्या

murder

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमधील शहागंज मंडीत शुक्रवारी एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली. या मृत गुंडांचे नाव जमीर खान शब्बीर खान आहे. त्याच्यावर अनेक चोरीच्या आणि घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हि हत्या पैशाच्या देवाण- घेवाणीतून झाल्याचे समजत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. काय आहे … Read more

घाटी रुग्णालयातील व्हेंटीलेटर्स तपासण्यासाठी दिल्लीहून तज्ज्ञांची समिती शहरात

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील खराब व्हेंटिलेटर्सची पाहणी करण्यासाठी दिल्लीहून केंद्र शासनाच्या वतीने डाॅ. राम मनोहर लोहिया आणि सफदरजंग रुग्णालयातील दोन तज्ज्ञ डाॅक्टर्स शहरात येत आहेत. अशी माहिती केंद्रशासनाचे असिस्टंट साॅलिसिटर जनरल अनिलसिंग यांनी न्या. रविंद्र घुगे आणि न्या. बी. यु. देबडवार यांच्या खंडपीठाला बुधवारी दिली. आता ठाम भूमिका घ्यायलाच हवी. रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ … Read more

दिलासादायक…! घाटी रुग्णालयात 12 व्हेंटिलेटरची वाढ

औरंगाबाद : जिल्हयासह शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे.  त्यामुळे ठिकठिकाणांहून दाखल होत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे घाटी रुग्णालयात व्याप जास्त असल्याने आरोग्य सुविधेत वाढ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. पाहायला मिळत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात व्हेंटिलेटरच महत्व हेरून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे यांच्यात CSR फंड मधून 25 व्हेंटिलेटर … Read more

घाटी रुग्णालयात आणखी १८ रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी, नाशिक, मनमाड येथील एका रुग्णाचा समावेश

औरंगाबाद | कोरोनाचा आकडा वाढत असताना  मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यात घाटी रुग्णालयात आणखी १८ कोरोनाच्या रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७ रुग्ण तर नाशिक, मनमाड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात आणखी १८ कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती घाटी रुग्णालयाने जाहीर केली आहे. … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात आणखी अकरा रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी

ghati

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. घाटी रुग्णालयात आणखी ११ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली असून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. घाटी रुग्णालयात आज दुपारी आलेल्या अहवालानुसार आणखी ११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात अंगुरीबाग येथील ९३ वर्षीय पुरुष रुग्णाचा … Read more

घाटीला निधीची कमतरता पडू देणार नाही ; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे प्रतिपादन

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. घाटी रुग्णालयात रुग्णांचे  प्रमाण अधिक असल्याने घाटीला आवश्यक मनुष्यबळ, साहित्य तसेच इतर सर्व सोयी-सुविधा पुरविण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, रुग्णसेवेसाठी घाटीला निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पुढील नियोजन करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी … Read more

घाटीत आणखी पाच रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी

ghati

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात आणखी पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात चार रुग्ण हे औरंगाबाद, तर एक रुग्ण जालना जिल्ह्यातील आहे. घाटी रुग्णालयात आणखी पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यात हर्सूल, फुलेनगर येथील ३५ वर्षीय पुरुष, पुष्पानगरी येथील ८३ वर्षीय स्त्री, गोलेगाव सिल्लोड येथील ६५ वर्षीय स्त्री, वाळूज, औरंगाबाद … Read more