इंडियन फार्मा डिपार्टमेंटने कोरोनावरील प्रभावी औषध रेमेडिसवीर आणि टॉसिलीझुमबच्या ओव्हर-प्रिस्क्रिप्शनवर घेतला आक्षेप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अँटी-व्हायरल ड्रग्ज रेमेडिसविर या कोरोनावरील उपचारातील सर्वात प्रभावी औषधाबद्दल भारतीय औषध विभागाने चिंता व्यक्त केली आहे. सरकारी सूत्रांनी एका न्यूज चॅनेलला सांगितले की, फार्मा विभागाने अँटी-व्हायरल औषधोपचार रेमेडिसवीर आणि टॉसिलीझुमॅबच्या ओव्हर-प्रिस्क्रिप्शनवर आक्षेप घेतला आहे. या संदर्भात, फार्मा विभागाने आरोग्य मंत्रालयाला या औषधांच्या ओव्हर-प्रिस्क्रिप्शनवर अंकुश ठेवण्याचे आवाहन केले आहे. जगातील बर्‍याच देशांतील … Read more

आपल्यासारखंच पेशंटना पण कुटुंब आहे ना राजा? मग आपण डॉक्टर असताना त्यांना न वाचवता घरी थांबून कसं चालेल??

कोरोना संकटाच्या काळात पेशंट नावाच्या एका कुटुंबाची जबाबदारी कायम आपल्यावर आहे याची जाणीव कायम ठेवणाऱ्या डॉ. शुभांगी मोरे यांच्याविषयी त्यांच्या मुलाने लिहलेलं कृतज्ञतापर पत्र..!!

बाजारात येताक्षणीच लोकप्रिय झाली ‘कोरोना कवच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी’, ‘या’ राज्यांमध्ये होते आहे सर्वाधिक विक्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांमध्ये कोरोना कवच हेल्थ विमा पॉलिसी ही बाजारामध्ये येताक्षणीच अत्यंत लोकप्रिय झाली आहे. कोविड -१९ या साथीच्या आजाराचा प्रसार पाहता, जवळजवळ सर्व सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांनी 10 जुलैपासून कोरोना विषाणूच्या संसर्गासाठी हे उत्पादन देऊ केले आहे. या साथीच्या उपचारासाठी लोकांना स्वस्त दराने आरोग्य विमा संरक्षण … Read more

करोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या, भाजप नेत्याचा अजब सल्ला

कोलकाता । कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. अनेक मोठे शास्त्रज्ञ कोरोनावर वॅक्सीन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात आता पश्चिम बंगालचे भाजप प्रदेश अध्यक्ष आणि खासदार दिलीप घोष यांनी एक अजब सल्ला दिला आहे. गोमूत्राचे महत्व सांगत असताना दिलीप घोष यांनी लोकांना करोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. ‘गोमूत्र पिल्यानं शरीराची व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक … Read more

इस्लामविरोधी असल्याचा आरोप करत इम्रान सरकारने घातली PUBG वर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने लोकप्रिय मोबाइल गेम PUBG वर बंदी घातली आहे. हा खेळ इस्लामविरोधी असल्याचा आरोपही सरकारने केला आहे. सरकारने या गेमचे आरोग्यास हानिकारक असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की, हे एक अत्यन्त वाईट असे व्यसन आहे. सरकारने याबाबत म्हटले आहे की, या गेमच्या व्यसनामुळे तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर … Read more

सोलापूरात घरातील खोल्या आणि शौचालयांवरून ठरणार होम क्वारंटाइनची संख्या

सोलापूर प्रतिनिधी । देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांचा चढता क्रम पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोलापूरमध्ये आजपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका आयुक्तांनी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सोलापूरमध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना १७ दिवस घरातच होम क्वारंटाइन करण्यात येणार … Read more

सॅनिटायझर्सवर १८ टक्के जीएसटी आकारण्यामागे केंद्रानं दिलं ‘हे’ कारण

नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. कोरोना काळात हॅण्ड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तुंच्या श्रेणीत केल्यानं त्याला जीएसटीतून वगळण्यात यावं अथवा त्यांच्या जीएसटी कमी करण्यात यावा, अशी मागणी काही दिवसांपासून होत आहे. विरोधी पक्षांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. सातत्यानं उपस्थित केल्या जात असलेल्या हॅण्ड सॅनिटायझरवरील मागणीवर अर्थ मंत्रालयानं अखेर … Read more

रशियाची ‘ती’ बहुचर्चित लस बाजारात कधी येणार? उत्तर मिळालं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशियातील एका विद्यापीठानं करोनावरील पहिली लस यशस्वीरित्या विकसित केल्याचा दावा केला होता. दरम्यान, ही लस छोट्या प्रमाणात करण्यात आलेल्या मानवी चाचणीदरम्यान यशस्वी ठरली असून ती माणसांसाठी सुरक्षित असल्याचंदेखील विद्यापीठानं म्हटलं होतं. मॉस्कोच्या सेचेनोव्ह विद्यापीठानं ३८ स्वयंसेवकांवर यशस्वीरित्या ही चाचणी केली. त्याचबरोबर, रशियन सैन्यानेदेखील सरकारी गेमलेई राष्ट्रीय संशोधन केंद्रात दोन महिन्यांत समांतर … Read more

कोरोनाची लागण झाल्यानंतर असा आहे बिग बी अमिताभ बच्चन यांचा आहार

मुंबई | महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व गोष्टींची काळजी घेतलेली असतानाही त्यांना कोरोनाची लागण झाली. बीग बी हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत आहेत. अमिताभ बच्चन यांचे वय, आरोग्य आणि जुने आजार लक्षात घेता त्यांच्या डाएटची विशेष काळजी घेतली जात आहे. बिग बींचे डाएट आरोग्य तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या … Read more

धक्कादायक! कोरोनाबाधित व्यक्तीचा हॉस्पिटलच्या शोधात दुचाकीवरून पुणे शहभर प्रवास

पुणे । पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रुग्णांची संख्या तुलनेने वाढते आहे. या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये पुरेसे बेड असल्याचे सांगितले जात असतानाच, एक कोरोनाबाधित व्यक्ती स्वतः दुचाकीवर फिरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हॉस्पिटलमध्ये जागा शोधत असल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. अखेरीस शनिवारी सायंकाळी त्या व्यक्तीला पिंपरी-चिंचवडमधील एका हॉस्पिटलमध्ये जागा मिळाली. निगडी परिसरात राहणारी … Read more