जिल्हा परिषद निवडणुकांचे वेध; नोव्हेंबर अखेरपर्यंत जाहीर होणार आरक्षण सोडत

औरंगाबाद – येत्या फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ दोन महिन्यांत समाप्त होत आहे. फेब्रुवारीतील या निवडणुकांची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषद अध्यक्षपदासह विविध गटांतील आरक्षणाची सोडत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद जिल्हा … Read more

औरंगाबाद मनपाच्या वतीने नवीन मतदार नोंदणी सुरु

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता तारखेवर मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना नोंदणी करता यावी, यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. औरंगाबादमधील मतदारांच्या जुन्या यादीतील नावे, फोटोतील दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. यादीत नाव नसणारे आणि नवीन मतदार यांना 30 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी … Read more

14 डब्यांना सोडून धावत्या रेल्वेचे इंजिन गेले पुढे, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

awb

औरंगाबाद – आपल्या वेगात धावणाऱ्या औरंगाबाद- हैदराबाद स्पेशल एक्सप्रेसचे इंजिन 14 डब्यांना सोडून पुढे गेल्याची घटना आज सायंकाळी औरंगाबादेतील शिवाजीनगर रेल्वे फाटकाजवळ घडली. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून औरंगाबाद- हैदराबाद स्पेशल एक्सप्रेस आपल्या नियमित वेळेवर रवाना झाली. काही अंतरावर जात नाही तोच कपलिंग निघाल्याने रेल्वेचे … Read more

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर 30 किलो सोन्याची खरेदी

औरंगाबाद – धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर औरंगाबादेत तब्बल 30 किलो सोने खरेदी करून दिवाळी पर्वास उत्साहात प्रारंभ केला आहे. बऱ्याच दिवसानंतर ज्वेलर्सच्या लहान-मोठ्या शोरूम मध्ये मंगळवारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली तर अनेक मोठ्या शोरूममध्ये तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. दिवाळीला नुकतीच सुरुवात झाली आणि शहर रोषणाईत न्हाऊन गेले. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीला खरेदी शुभ मानली … Read more

औरंगाबादेत आता ‘नो व्हॅक्सिन नो रेशन’; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद – राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील फक्त 55 टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या अत्यंत कमी म्हणजे 22 टक्के एवढीच आहे. याबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के … Read more

पाण्याच्या प्रश्नाला घेऊन मनसे पुन्हा आक्रमक

mns

औरंगाबाद – शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून खुर्चीत बसल्याने आपले हिंदुत्व विसरली आहे. व आता हे ध्वज दिवाळी असे काही केविलवाणे प्रयत्न करून आम्ही हिंदू आहोत असा आव आणण्याचा हे लोक प्रयत्न करत आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना मुबलक पाणी मिळायला हवे होते मात्र सत्ताधारी शहरात ध्वज लावण्यात व्यस्त आहेत. 50 हजार भगवे ध्वज … Read more

पॅरालेसिसबद्दल एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांकडून जनजागृती

mgm

औरंगाबाद – एमजीएम स्कूल ऑफ फिजीओथेरपी च्या वतीने जागतिक दिनानिमित्त टोणगाव येथे 30 ऑक्टोबर रोजी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी न्यूरो फिजिओथेरपीचा विद्यार्थ्यांनी कार्यालय बद्दल पथनाट्य सादर करून लोकांना या आजाराची माहिती दिली. प्यारालीसीस चा झटका आल्यानंतर त्वरित काय केले पाहिजे. तसेच या वेळेला इतके महत्त्व का आहे, नागरिकांनी दैनंदिन आहार आणि व्यायाम कसे … Read more

लसीकरणासाठी जिल्हा परिषदेची मोहीम! नोव्हेंबर अखेरपर्यंत 100 टक्के उद्दिष्ट गाठणाऱ्या गावांना देणार बक्षीस

औरंगाबाद – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने असंख्य कुटुंबांचे प्रचंड हाल झाले असूनही औरंगाबादकरांनी यातून योग्य तो धडा घेतलेला दिसत नाही. कारण दुसऱ्या लाटेत कोरोनाचा तडाखा बसल्यानंतर कोरोना लसीकरणासाठी औरंगाबादमधील नागरिक म्हणावा तेवढा प्रतिसाद देत नाहीयेत. येथील नागरिक लसीकरणाबाबत प्रचंड उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाच्या यादीत औरंगाबाद पाचव्या स्थानावर आहे. लसीकरणाबाबत एवढा गाफीलपणा ठेवू नका, … Read more

जिल्हा हादरला ! सावत्र बापाकडूनच मुलीवर अत्याचार, आईचेही होते समर्थन

Rape

औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशातच जिल्ह्यातून बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधम सावत्र बापाने आणि त्याचे मित्राने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. इतकंच नाही तर नराधम बापाने आणि तिच्या आईनं पीडित मुलीला वेदना देखील दिल्या आहेत. … Read more

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या जादा बसेस सुसाट

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सोमवारपासून दिवाळीनिमित्त विविध मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. यानुसार औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून पुणे मार्गावर 22 तर नागपूर मार्गावर चार जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. सर्व बसेसना प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दिवाळीनिमित्त मूळ गावी जाणाऱ्या कुटुंबीयांची संख्या मोठी असते. ही बाब लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी … Read more