रात्री ‘या’ वेळेतच वाजवा फटाके; अन्यथा होणार कारवाई

nikhil gupta

औरंगाबाद – रात्री आठ ते दहा या दोन तासातंच फटाके वाजवा, फटाक्यांच्या माळा लावू नका अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी काल पत्रकार परिषदेत दिला आहे. सर्वोच्च न्यायालय, हरित लवादाचे आदेश पाळा, शांततामय जीवनाचा नागरिकांचा हक्क अबाधित राहण्यासाठी सुधारित, हरित फटाक्यांचाच आग्रह धरा, फटाके घेताना सुधारित, हरित फटाकेच … Read more

दिवाळी नंतर फुटणार पाडापडीचे फटाके ! लेबर कॉलनी क्वार्टर्सवर 8 नोव्हेंबर पासून बुलडोझर

JCB

औरंगाबाद – शहरातील विश्वास नगर, लेबर कॉलनी येथील 20 एकर जागेतील शासकीय इमारती धोकादायक तसेच राहण्यास योग्य नसल्याने त्यावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाने 8 नोव्हेंबर रोजी बुलडोजर चालवण्यात येणार असल्याची नोटीस मनपाच्या बांधकाम विभागाने जारी केली आहे. यामुळे तेथील रहिवाशांना आठ दिवसांच्या आत आपल्या सदनिका खाली कराव्या लागणार आहेत. दिवाळीनंतर प्रशासकीय यंत्रणा पाडापाडीचे फटाके … Read more

शिवसेनेच्या ध्वज दिवाळी अभियानाला सुरुवात ! पन्नास हजार घरांवर फडकवणार भगवा ध्वज

ss

औरंगाबाद – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोठी मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण औरंगाबाद शहरातील जवळपास 50 हजार घरांवर शिवसेनेचा ध्वज फडकवण्याचे ध्वज दिवाळी अभियान आजपासून सुरु झाले. शहरतील अमरप्रीत चौकातून आज या मोहिमेला सुरुवात झाली. या प्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे हे उपस्थिती होते. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन … Read more

सातारा- देवळाईवर मनपाचा अन्याय का ? आमदार संजय शिरसाट यांचा सवाल

औरंगाबाद – सातारा परिसरातील विकासाच्या कामांसाठी निधीवाटपात अन्याय होऊ देणार नाही. जनहितासाठी व विकास कामांसाठी आपला आग्रह कायम राहील, अशी ग्वाही आमदार संजय शिरसाट यांनी दिली. रविवारी सातारा परिसरातील द्वारकादास नगर, अथर्व क्लासिक येथील सिमेंट रस्त्याचे उद्घाटन व अबरार कॉलनी येथील भूमिगत गटारीचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत … Read more

पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा संदेश पाठवून तरुण बेपत्ता

Crime

औरंगाबाद – पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा संदेश मोबाइलवर पाठवून एक विवाहित तरुण मागील चार दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. औरंगाबादमधील हर्सूल परिसरात ही घटना घडली असून या तरुणाचा शोध घेण्यासाठी वडिलांनी पोलिसात धाव घेतली आहे . 27 ऑक्टोबर रोजी हा तरुण घरातून निघून गेला असून पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत. हर्सूल पोलीस ठाण्यात … Read more

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मैदानात, मुंबईपर्यंत काढणार तिरंगा रॅली

mim

औरंगाबाद – राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमने जोरदार तयारी सुरु केली आहे. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत खासदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबादेत मोठी घोषणा केली आहे. मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार आहे. तिरंगा … Read more

ऐकावं ते नवलंच ! धडा शिकवण्यासाठी प्रियकरानेच फोडले प्रेयसीचे घर

Thief

औरंगाबाद – प्रेयसी सतत लग्न करण्याचा तगादा लावते म्हणून तिला धडा शिकवण्यासाठी प्रियकराने तिच्या घरी घरफोडी केल्याचा अजब प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. शहरातील जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये आठ दिवसांपूर्वी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. या चोरीचा तपास घेण्यासाठी पोलिसांना आठ दिवस लागले. मात्र तपास पूर्ण झाल्यावर गुन्हेगार समोर आला. पण तो या घरातील महिलेचा … Read more

औरंगाबाद शहराचा आता होणार अंडरग्राउंड नकाशा !

aurangabad mahanagar

औरंगाबाद – शहराचा आता अंडरग्राऊंड नकाशा तयार होणार आहे. प्रभाग नऊमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जीपीआर सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आहे. स्मार्ट सिटी अभियानातून मास्टर सिटी इंटीग्रेटेड प्रकल्प राबविला जात आहे. त्यात जीपीआर सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे जमिनीखालील विद्युत वाहिन्या, पाइपलाइन यासह इतर माहिती मिळणार आहे. मास्टर सिस्टम इंटीग्रेटेड प्रकल्पाचा प्रशासकांनी नुकताच आढावा … Read more

अतिवृष्टीमुळे महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ; कुलगुरूंचा निर्णय

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संलग्नित महाविद्यालय विद्यापीठाच्या मुख्य व परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी जाहीर केला आहे. संदर्भात 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या अधिसभेत च्या बैठकीत काही सदस्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. तेव्हा कुलगुरूंनी … Read more

प्रवास, गर्दी टाळा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Sunil chavhan

औरंगाबाद – सणासुदीच्या काळाला प्रारंभ झालेला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रवास, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने आवश्यक मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचा अवलंब करत समाजात वावरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे. प्रवास करण्यामुळे, गर्दीच्या ठिकाणी गेल्यामुळे आणि कोविड नियमांचे पालन न केल्यामुळे … Read more