आजपासून शासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा; सरकार निर्णयाला हायकोर्टात आव्हान

सोलापूर प्रतिनिधी । आजपासून (29 फेब्रुवारी) राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रकही शासनाकडून जारी करण्यात आले आहे. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवार सुटी राहणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात … Read more

अजित पवारांना मोठा दिलासा; सिंचन घोटाळ्या प्रकरणी एसीबीची क्लीन चिट

जनमंच संस्था व व्यावसायिक अतुल जगताप यांनी दाखल केलेल्या जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. जगताप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रामाणिकेतवर संशय व्यक्त करत, या प्रकरणात अजित पवारांचे नाव असल्याने चौकशी अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचा आरोप केला होता

पीएमसी बँक गैरव्यवहाराप्रकरणी रिझर्व्ह बँकेला दोष देऊ नका – उच्च न्यायालय

‘पीएमसी’ बँकेचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर देशामध्ये मोठी खळबळ उडाली होती. या नंतर रिझव्‍‌र्ह बँकेने खातेदारांच्या तातडीने पैसे काढण्यावर निर्बंध घातले होते. त्याविरोधात खातेधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेत विविध याचिका दाखल केल्या आहेत. यामध्ये रिझव्‍‌र्ह बँकेला पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. न्यायालय सध्या या प्रकरणी याचिकाकर्ते आणि रिझव्‍‌र्ह बँक यांचा अंतिम युक्तिवाद ऐकत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या याचिकाकेमध्ये उच्च न्यायालयाने खातेधारकांना पुन्हा एकदा चपराक लगावली आहे.

धुळे महापौरपदाच्या आरक्षणाचा वाद कोर्टात; रोटेशनाचा क्रम चुकविल्याचा नगरसेवकांचा आरोप

धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदाची माळ कोणाच्य गळ्यात पडणार यावरुन खलबते रंगली असतानाच, आता महापौरपदाच्या आरक्षणाचा वाद हायकोर्टात पोहचला आहे.

निवडणुका आल्यावरच आदेश, नोटीस निघतात कशा ? – अजित पवार

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे उच्च न्यायालयाने काल महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परभणी जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रेनिमित्य जनतेशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांनी न्यायालयाच्या आदेशाबाबत आपली प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले,” मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो पण मी माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कोणत्याही कमिटीच्या मिटिंगला उपस्थित नव्हतो, … Read more

मोबाईलमध्ये तसले फोटो बाळगणे गुन्हा होऊ शकत नाही – उच्च न्यायालय

तिरुअनंतपुरम | मोबाईलमध्ये फोटो बाळगणे स्त्री प्रतिबंधक निषेध कायद्यांतर्गत गुन्हा होऊ शकत नाही असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला आहे. अश्लील फोटो बाळगणे आणि विकणे कायद्याने गुन्हा आहे असे त्या महिलेने आपल्या दाखल केलेल्या याचिकेत म्हणले होते मात्र न्यायालयाने हि याचिका फेटाळून लावली आहे. … Read more

कोल्हापूरला खंडपीठ झालंच पाहिजे, आमदारांची मागणी

High Court Demand at Kolhapur

मुंबई | कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झालेच पाहिजे, अशी मागणी करत कोल्हापूरच्या आमदारांनी विधानभवना बाहेर जोरदार निदर्शने केली. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशी तेथील जनतेची मागणी आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील हजारो खटले उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायासाठी येथील जनतेला नाहक मुंबईला खेटे घालावे लागतात. कोल्हापूर खंडपीठासाठी वकील, पक्षकार, … Read more

सबरीमाला प्रकरण : मीडिया आणि भक्तांना मंदीरात जाण्यापासून रोखू नये – उच्च न्यायालय

Shabarimala

त्रिवेंद्रम | भक्त आणि प्रसार माध्यमांना सबरीमाला मंदीरात जाण्यापासून थांबविता येणार नसल्याचे केरळ उच्च न्यायालाने म्हटले आहे. तथापि, सरकारला मंदीराच्या रोजच्या कामकाजात हस्तक्षेप करता येणार नाही. तसेच परिसरात वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात यावी असेही म्हटले आहे. राज्य सरकार सबरीमाला मुद्दाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केला असून हे … Read more