कस्टम विभागाकडून अगरबत्ती तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, सरकारी सवलतीचा घ्यायचे चुकीचा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत एच शाह आणि त्याचा मुलगा श्रीरोनिक शाह यांना व्हिएतनामहून अगरबत्तीच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कस्टम विभागाने चेन्नई येथून अटक केली. याव्यतिरिक्त, कस्टम विभागाने 161.94 मेट्रिक टन अगरबत्ती आणि 68.36 मेट्रिक टन अगरबत्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणारे सामान जप्त केले आहेत. हे दोन्ही सामान मेसर्ससह व्हिएतनाममधून आयात केलेल्या कंटेनरमधून जप्त केले. त्यावर ‘इंडियन … Read more

यंदाच्या बजेटमध्ये सरकारने ‘हा’ निर्णय घेतल्यास स्मार्टफोनसह ५० वस्तू होतील महाग

परदेशातून आयात होणाऱ्या सुमारे ५० वस्तूंवर भारत आता आयात शुल् (Custom Duty) आकारणार आहे. यात इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल वस्तू, रसायने आणि हस्तकलेसारख्या वस्तूंचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार चीन आणि इतर देशांकडून ५६ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंच्या आयातीवर आयात शुल्क लागू करू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी २०२० च्या अर्थसंकल्पात याची घोषणा करू शकतात. देशातील सध्याच्या अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता हे पाऊल उचलल्या जाण्याची शक्यता आहे.