राज्यात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे कायदे; खासदार जलीलांचा सरकारवर घणाघात

औरंगाबाद – मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम पक्षाच्या वतीने येत्या 27 नोव्हेंबर रोजी मुंबईत तिरंगा रॅली होणार होती. मात्र त्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. याबाबत खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खासदार जलील यांनी यासंदर्भात एक ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. खासदार जलील यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले की, राष्ट्रवादी … Read more

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मैदानात, मुंबईपर्यंत काढणार तिरंगा रॅली

mim

औरंगाबाद – राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमने जोरदार तयारी सुरु केली आहे. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत खासदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबादेत मोठी घोषणा केली आहे. मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार आहे. तिरंगा … Read more

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आज औरंगाबादेत; मनपा निवडणुकीची आखणार रणनीती

mim

औरंगाबाद – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे शुक्रवारी औरंगाबाद शहरात आगमन झाले. आज शनिवारी खुलताबाद येथे एमआयएमच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. औरंगाबादमधील आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात काय रणनिती आखायची यावर या बैठकीत चर्चा होत आहे. दरम्यान, काल शुक्रवारी असदुद्दीन ओवैसी यांचे औरंगाबादेत आगमन झाले त्यावेळी कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची मोठी … Read more

ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी नाव बदलूनच दाखवावे; इम्तियाज जलीलांचे चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या एक नवा वादसुरु झाला आहे तो म्हणजे औरंगाबाद शहराचा उल्लेख औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा करण्यात आल्याचा होय. या नामांतराच्या मुद्यावरून राज्य सरकारवर भाजप नेत्यांकडून टीका केली जाऊ लागली आहे. नुकतेच एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत चॅलेंज दिले आहे. “ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी शहराचे नाव बदलून … Read more

…अन खासदार जलील भर बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर भडकले

Imtyaj jalil

औरंगाबाद – तब्बल दोन दशकानंतर औरंगाबादेत रेल्वेचा प्रलंबित प्रश्नांनावर आज बैठक झाली. या बैठकीत मराठवाड्याने मागणी केलेल्या नव्या रेल्वे लाईनवर सर्वेक्षणात फायदा मिळणार नसल्याचे रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगताच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील रेल्वे प्रश्नांवरील बैठकीत चांगलेच भडकले. आधीच मागास भाग त्यात नवीन रेल्वे येणार नसल्यास या भागाचा विकास कसा होईल, असा संतापजनक सवाल खा. जलील … Read more

विद्यार्थ्यांसाठी खासदार जलील यांचे ‘मिशन तालीम’

imtiaz jalil

औरंगाबाद – आधी कोरोना प्रादुर्भाव आणि आता अतिवृष्टी यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. यावर शाश्वत उपाययोजना म्हणून खासदार इम्तियाज जलील यांनी ‘मिशन तालीम’ हा एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या मिशन तालीम अंतर्गत सर्व प्रकारचे शैक्षणिक, शालेय … Read more

सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – पालकमंत्री सुभाष देसाई

Sunil

औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यास शासन कटीबध्द असून शेतकऱ्यांच्या शासन सदैव पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृष्य प्रणालीव्दारे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांचे नुकसान, जिवितहानी तसेच देण्यात येणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री … Read more

शेतकरी उद्धवस्त, औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; जलील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

औरंगाबाद – जिल्ह्यात पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली आहे. गेल्या आठवडाभर पावसाने होत्याचं नव्हतं केलंय. काढणीला आलेली पीकं डोळ्यादेखत वाहून गेलीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचं हजारो-लाखो रुपयांचं नुकसान झालंय. त्यामुळे उद्धवस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज असल्याचं सांगत औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

लॉकडाऊन काळात दुकाने उघडण्यासाठी अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी खासदार जलीलांसह 26 जणांविरुद्ध दोषारोपपत्र

Imtyaj jalil

औरंगाबाद – कोरोना महामारी विरुद्ध प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये बंद असलेली दुकाने उघडावीत यासाठी कामगार उपायुक्तांच्या सोबत हुज्जत घालणे, महिला पोलिस कॉन्स्टेबल धमकावणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 26 दुकानदार विरुद्ध दाखल गुन्ह्याचे 313 पानांचे दोषारोपपत्र तपास अधिकारी तथा क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. गणपत … Read more

स्वातंत्र्य दिनी काळे झेंडे दाखवणे आले अंगलट; खासदारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

kale zende

औरंगाबाद – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी ‘माझे विद्यापीठ परत द्या’ या मागणीसाठी दिल्ली गेट येथे स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवले होते. याप्रकरणी खासदारांसह 24 पदाधिकाऱ्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबादला होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी … Read more