व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्यात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे कायदे; खासदार जलीलांचा सरकारवर घणाघात

औरंगाबाद – मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम पक्षाच्या वतीने येत्या 27 नोव्हेंबर रोजी मुंबईत तिरंगा रॅली होणार होती. मात्र त्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. याबाबत खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खासदार जलील यांनी यासंदर्भात एक ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे.

खासदार जलील यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रॅलीला परवानगी दिली जाते. त्याचवेळी आमच्या 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रॅलीला परवानगी नाकारली जाते. याबाबत महाराष्ट्र सरकारने स्पष्टीकरण देऊ शकेल का ?, असा सवाल जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. पुढे आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, या राज्यात वेगवेगळ्या लोकांना वेगळे कायदे आहेत का ? असा सवाल त्यांनी केला आहे.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे पोलिस महासंचालकांना टॅग करित त्यांना उत्तर देण्याची विनंती खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. एमआयएमच्या तिरंगा रॅलीची आगामी तारीख लवकरच सांगितली जाईल. अन्यायाविरुद्ध लढा सुरुच राहिल असे त्यांनी सांगितले.