साताऱ्याचे खासदार उदयनराजेंना गुंड म्हणणाऱ्या उद्योजकाला समर्थकांकडून चोप, कपडे फाडून फासले काळे

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके साताऱ्याचे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल कोणी काही बोलल्यास सातारा जिल्ह्यातील समर्थकांकडून त्याची चांगलीच दखल घेतली जाते याचा प्रत्यय अनेकवेळा आलेला आहे. नुकतीच अशी घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे घडली. या ठिकाणी एका उद्योजकाने खासदार उदयनराजे भोसले यांचा गुंड असा उल्लेख केला. यावर आक्रमक झालेल्या खासदार समर्थकांनी त्या उद्योजकाला … Read more

उजनीचे पाणी वळवण्याचा निर्णय अखेर रद्द, आंदोलन स्थगित

Jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सोलापूरचे मुख्य जलस्रोत असलेल्या उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला, बारामतीला वळवण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूरकरांनी पाणी वळवण्याच्या निर्णयवरून आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. आज उपसचिव यांनी 22 एप्रिल 2021 रोजी काढलेला आदेश रद्द केल्याचे पत्र काढले आहे. … Read more

उजनी पाणी संघर्ष शिगेला, धग मात्र शरद पवार यांच्या गोविंदबाग पर्यंत, वाढवली सुरक्षा

govindbag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी वळवण्याच्या निर्णयावरून चांगलाच गदारोळ माजला आहे. मात्र हा निर्णय रद्द करण्यात आल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले असले तरी देखील सोलापूर मध्ये या आंदोलनाचा भडका उडाला आहे. या आंदोलनाची धग आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानापर्यंत … Read more

उजनीचं पाणी चोरण्याचा बारामती आणि इंदापूरकरांचा डाव उधळून लावू ः  खासदार रणजितसिंह निंबाळकर

Solapur

सोलापूर | नीरा देवधर बरोबरच आता उजनीचं पाणी चोरण्याचा डाव बारामती आणि इंदापूरकरांनी आखला आहे, पण त्यांचा हा डाव उधळवून लावू असा इशारा माढयाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज दिला. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे.या निर्णयावरुन सोलापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद … Read more

कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे नैराश्यातून वृद्धाची आत्महत्या

बारामती : हॅलो महाराष्ट्र – इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका रुग्णाने कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे आत्महत्या केली आहे. मागच्या ४ – ५ दिवसांपासून त्या रुग्णाला अंगदुखी, घसादुखी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता त्यामुळे त्यांना कोरोनाची तपासणी करण्यास सांगितले. यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. प्रकाश विष्णूपंत भगत असे आत्महत्या केलेल्या … Read more

Video : पूराच्या पाण्यात दुचाकीसह तरुण गेला वाहून; जेसीबीच्या सहाय्याने गावकर्‍यांनी धाडस करुन वाचवले प्राण

bike flood water

पुणे प्रतिनिधी | जिल्ह्यात सर्वत्र पाऊसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती तयार झाली आहे. इंदापूर येथे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या एकास जेसीबीच्या सहाय्याने वाचवण्यात यश आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. इंदापूरात दुचाकीवरुन निघालेल्या एकाला पाण्याच्या प्रवाहाने ओढले. गावकर्‍यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने तेथे जेसीबी बोलावला. … Read more

महाराष्ट्र केसरी; इंदापूरच्या सागर मारकडची सुवर्ण कामगिरी, पुण्याचा अभिजीत कटके ६ सेकंदात चीतपट विजयी

पुणे प्रतिनिधी | ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आज ६१ किलो वजनी गटातील माती विभागात पुणे जिल्हयाच्या सागर मारकडने व पुणे शहराचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या निखिल कदमवर चीतपटीने मात करीत सुवर्ण पदकावर कब्जा केला. सागर हा मारकड कुस्ती केंद्र, इंदापूर येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या … Read more

हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेशाचा सावध पवित्रा ; राष्ट्रवादीवर घेतले चांगलेच तोंडसुख

इंदापूर प्रतिनिधी | भाजपच्या वाटेवर असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. त्याआधी त्यांनी अकलूज येथे जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी इंदापूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. जुन्नरची जागा आघाडीत काँग्रेसला सोडली. मात्र इंदापूरची जागा सोडायला राष्ट्रवादी तयार नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शब्द देऊन देखील त्यांनी तो शब्द पाळला नाही. … Read more

सुप्रिया सुळेंना केलेल्या मदतीची परत फेड करा : हर्षवर्धन पाटील

मुंबई प्रतिनिधी |  हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आग्रह धरलेला असतानाच राष्ट्रवादीने इंदापूरचे जागा जिंकल्याने माघारी देण्यास नकार दिला आहे. अशात काँग्रेस आणि राष्ट्रवादी इंदापूरच्या जागेचा तिढा कसा सोडवणार हा प्रश्न असतानाच हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीला सुप्रिया सुळेंना केलेल्या मदतीची आठवण करून दिली आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला इंदापूरची जागा फक्त सोडू नये तर जागा सोडून सुप्रिया … Read more

बारामतीकरांचा विश्वासघात ; इंदापूर काँग्रेसला सोडणार नाही ; हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर

इंदापूर प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे इमाने इतबारे काम करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्या वाट्याला पुन्हा विश्वासघात येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे इंदापूरची जागा पुन्हा जिंकतील त्यामुळे राष्ट्रवादी हि जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडणार नाही असा पवित्रा राष्ट्रवादीने जागा वाटपाच्या बैठकीत घेतला आहे अशी माहिती … Read more