प्रांताधिकार्‍यांनी तलाठ्यांना कार्यालयात बोलावू शिवीगाळ करत दिला चोप

इस्लामपूर प्रतिनिधी | प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तीन तलाठ्यांना सोमवारी रात्री आठच्या सुमारास प्रांत कार्यालयात बोलवून शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार संबंधीत तलाठ्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य तलाठी संघ सांगली जिल्हा शाखेने प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई होईपर्यंत उद्यापासून वाळवा उपविभागातील तलाठी व मंडलाधिकारी हे … Read more

टेपरेकॉर्डर असणार्‍या इस्लामपूर – म्हसवड एस.टी. बस ने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळवलेली..

गावाकडच्या गोष्टी | सकाळी दहा वाजले की आम्ही गावातील बसअड्ड्यावर जमायचो.इस्लामपूर -म्हसवड गाडी बरोबर टायमिंगला साडेदहा वाजता यायची.उन्हाळा पावसाळा हिवाळा गाडी राईट टाइम म्हजी राईट टाइम.या गाडीचे वाहक संजय चव्हाण गमतीने म्हणायचे,’तुमच्या गावात गाडी आली की कामाला जाणाऱ्या माणसांनी खुरपी हुडकायला सुरुवात करायची.आणि पुन्हा माघारी आली की सुट्टी करायच्या नादाला लागायचं.”एवढं या गाडीचं परफेक्ट टायमिंग. … Read more

सांगलीत गायीला दुधाचा अभिषेक, मंत्र्यांच्याच दूध संघांना सरकारी अनुदान; गोपीचंद पडळकरांचा आरोप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘राज्यातील दूध उत्पादक अडचणीत असताना सरकारमधील मंत्र्यांनी स्वतःच्याच दूध संघातील दूध खरेदी करून अनुदान लाटले. दूध उत्पादक उपाशी असताना सरकार मात्र तुपाशी आहे,’ अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केली. त्यांनी आटपाडी येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून आणि गायींसह रस्त्यावर ठिय्या मारून दूध दरवाढीचे आंदोलन केले. राज्यात दूध … Read more

गर्भवती महिलेने ग्रहणातील अंधश्रद्धा दिल्या झुगारुन

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात गर्भवती महिलेने पिढ्यान पिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या. इस्लामपुरातील महात्मा फुले कॉलनी मधील गर्भवती महिला सौ. समृद्धी चंदन जाधव यांनी ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे ,फळे कापणे, झाडांची फळे पाने तोडणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली … Read more

मुंबईतल्या धारावीतून इस्लामपूर मध्ये २१ जण आले विना परवाना; सांगलीत खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । सर्वात हॉट स्पॉट असलेल्या धारावी मुंबई येथून इस्लामपूर शहरात चौघे जण छुप्या पध्दतीने दाखल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. नगरपालिकेच्या प्रशासनाला माहिती मिळताच चौकशी केली असतां अजून १६ जण आल्याची माहिती मिळाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. यातील काही जण सांगली येथे नातेवाईकांकडे जाणार होते. हे सर्वजण एकत्रित बसने आल्याचे स्पष्ट … Read more

कोरोनाविरुद्ध लढण्याचा इस्लामपूर पॅटर्न, २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त – जयंत पाटील

सागली प्रतिनिधी | जिल्ह्यातील इस्लामपूर शहरातील एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ वर पोहोचल्याने सांगलीकर चिंतेत होते. मात्र आता योग्य पावले उचलल्याने सांगलीतील २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाविरुद्धच्या सांगली पॅटर्नबाबत आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. यावेळी, तुम्हा सर्वांना सांगण्यात आनंद … Read more

इस्लामपूरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण कशी झाली? घ्या जाणून

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात १२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यतल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता अकरा वरून २३ वर पोहोचली आहे. संपूर्ण राज्यात सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वात जास्त आढळल्याने खळबळ उडाली आहे. या 12 नव्या रुग्णांमध्ये ६ महिला आणि ६ पुरुषांचा समावेश असून त्यांना इन्स्टिट्युशनल कॉरांटाईन मध्ये ठेवण्यात … Read more

सदाभाऊ खोत इस्लामपूर मधून ‘कमळ’ चिन्हावर लढणार?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे भाजपने आगामी विधानसभा लढण्याची जोरदार तयारी केली असून भाजप व शिवसेना प्रत्येकी १३५ व मित्र पक्षांना १८ जागा असा फॉर्म्युला तयार केला आहे. मात्र मित्रपक्षांमधील अनेक जागा या कमळ चिन्हावर लढविल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना सहा जागा मागत असली तरी किमान तीन … Read more