एकनाथ खडसे आज बांधणार घड्याळ ; शरद पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

sharad pawar and khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 40 वर्षांपासून ज्या नेत्याने महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भाजपचा प्रचार केला, ज्यांनी भाजप वाढवली, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाला बळ दिले ते भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच … Read more

एकनाथ खडसेंसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार? काय आहेत शक्यता जाणून घ्या

Eknath Khadse

मुंबई | भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकला आहे. खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश पक्का समजला जात आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्री करणार असल्याची चर्चा आहे. खडसे यांना मंत्रीपद द्यायचे झाले तर राष्ट्रवादीला एका विद्यमान मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातीप मंत्र्याला यासाठी राजीनामा द्यावा लागू शकतो अशी … Read more

‘एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश अंधारात नाहीतर, उजेडात होईल’- जयंत पाटील

मुंबई । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. “गेले ३ दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले. (Eknath Khadse to … Read more

मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करु नये म्हणणाऱ्या फडणवीसांना जयंत पाटलांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले…

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थिल्लरपणा शोभत नाही अशी जहरी टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं. प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला, असं जयंत पाटील म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत जयंत पाटील … Read more

…आणि जयंत पाटलांना अश्रू झाले अनावर (Video)

Jayant Patil

सांगली प्रतिनिधी | सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील गेले होते. पण, मंत्री जयंत पाटील आपला खंदा कार्यकर्ता गेल्याने चांगलेच भावूक झाले,ते ढसाढसा रडू लागले असे कार्यकर्ते आता मिळणं अवघंड. राजाराम बापूंनंतर मी टिकलो कारण … Read more

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर दोन्ही पक्षातील नेत्यांची टोलवाटोलवी; प्रीतम मुंडेंनंतर आता सुप्रिया सुळे म्हणाल्या..

पुणे । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल दोन्ही पक्षातील नेत्यांची अळीमिळी गुपचिळी सुरुच आहे. आधी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी खडसेकाकांच्या पक्षांतराचा चेंडू त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसेंकडे टोलवला होता, आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखवलं आहे. (NCP MP Supriya Sule says ask Jayant Patil … Read more

‘भुजबळ साहेबांनी धीर दिला म्हणून, मी व्हीलचेअरवर असतानाही अर्थसंकल्प मांडू शकलो’; जयंत पाटलांचा आठवणींना उजाळा

मुंबई । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षातील दिग्गज नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जयंत पाटलांनी आपल्याला झालेल्या अपघातावेळी भुजबळांनी केलेली मदत यानिमित्ताने सांगितली. छगन भुजबळांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी अर्थसंकल्प तयार केला, व्हीलचेअरवर बसून सभागृहात मांडलाही, अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या. ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर … Read more

डॉक्टर चुकीचे वागल्यास खपवून घेणार नाही : जयंत पाटील

Jayant Patil NCP

सांगली । काही डॉक्टर उपचारात हेळसांड करीत रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. भरमसाठ बिले करीत आहेत. माझ्याकडे तशा काही तक्रारी आल्याने मी डॉक्टरांचे उपचार व बिलांचे ऑडीट करण्याबाबत बोललो आणि तशी व्यवस्था उभा केली. कोविडच्या या संकटकाळात कोण चुकीचे वागत असेल तर खपवून घेणार नाही. आम्ही जनतेच्या बाजूने ठाम उभा राहू. असा विश्र्वास राज्याचे जलसंपदामंत्री व … Read more

राज्याचे विरोधी पक्षनेते आहात की, बिहारचे निवडणूक प्रभारी? फडणवीसांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर जयंत पाटलांचा टोला

मुंबई । अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर बृह्नमुंबई महापालिकेनं बुधवारी कारवाई केली. अनधिकृत असलेलं बांधकाम महापालिकेनं पाडलं. कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत टीका केली. फडणवीस यांनी टीका करताना हिंदी भाषेचा वापर केला. त्यावरून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना चिमटीत पकडत प्रश्न उपस्थित … Read more

वाढलेल्या मृत्यूदराचे क्रेडिट जयंतरावांचेच; सदाभाऊ खोतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीत करोना रुग्णांचा वाढता मृत्यूदर आरोग्य यंत्रणा आणि पालकमंत्र्यांचे अपयश स्पष्ट करणारा आहे. कठीण काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गतिमान करण्याऐवजी पालकमंत्री जयंत पाटील मुंबईत जाऊन बसले आहेत. पूरबाधित गावांना बोटी देण्याचे श्रेय घेण्यासाठी धडपडणा-या पालकमंत्र्यांनी आता जिल्ह्यातील वाढत्या मृत्यूदराचेही क्रेडिट घ्यावे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत आहेत. दरम्यान, आमदार सदाभाऊ … Read more