कोरोनाविरुद्ध लढण्याचा इस्लामपूर पॅटर्न, २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त – जयंत पाटील

सागली प्रतिनिधी | जिल्ह्यातील इस्लामपूर शहरातील एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ वर पोहोचल्याने सांगलीकर चिंतेत होते. मात्र आता योग्य पावले उचलल्याने सांगलीतील २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाविरुद्धच्या सांगली पॅटर्नबाबत आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. यावेळी, तुम्हा सर्वांना सांगण्यात आनंद … Read more

परदेशातील प्रवाशांना होम क्वॉरंटाईनची सक्ती – जयंत पाटील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील परदेश प्रवास, दौरा करून आलेल्या परंतू करोना विषाणूची लक्षणे नसलेल्या व्यक्तींना होम क्वॉरंटाईनच्या सक्तीचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या आठ हॉस्पिटलमध्ये ८६ बेडची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात करोनाच्याबाबत … Read more

देवेंद्र फडणवीसांना दिल्लीतील कामाला शुभेच्छा; जयंत पाटलांचा टोला

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानामुळे आम्हाला आनंद झाला. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत, हे यातून स्पष्ट होत आहे. त्यांच्या दिल्लीतील कामाला शुभेच्छा आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट … Read more

मंत्री जयंत पाटील यांच्याकडून तिसरीतील श्रेयाचे कौतुक; व्हायरल हस्ताक्षराची घेतली दखल

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : सध्याच्या काळात सोशलमिडियामुळे कोणतीही दर्जेदार कलाकृती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. एखादा व्हिडीओ, फोटो किंवा इतर कलाकृती नेटकऱ्यांना आवडल्यास नेटकरी ते आवर्जून शेअर करतात. नगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कडूवस्ती येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या श्रेयाचे सुंदर हस्ताक्षर सोशलमिडीयावर चांगलेच व्हायरल झाले. अनेकांचा श्रेयाच्या या सुंदर अक्षरावर विश्वास बसला नाही. … Read more

‘आजही गोडसे जिवंत’; जामिया गोळीबार प्रकरणी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

दिल्ली येथे एका तरूणाने जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर गोळीबाराच्या घटनेवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ”सत्ताधीशांना विरोध सहन होत नाही, आजही गोडसे जिवंत आहे. केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही विरोधात देशभरात जनता शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करतआपली भूमिका मांडत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांचे हस्तक गोळीबार करत आहेत, अशी टीका जलसंपदामंत्री  जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील, विश्वजित कदमांवर गुन्हा दाखल करा! सांगली भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांत धाव

एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात सांगलीमध्ये २५ जानेवारी रोजी भाजप वगळता काढण्यात आलेल्या सर्व पक्षीय मोर्चामध्ये जलसंदमंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज थेट जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीकरत शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांच्या शिष्टमंडळाने आज पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्याकडे तक्रार दाखल केली.

सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी ‘कॅबिनेट समन्वय समिती’ची स्थापना; प्रत्येकी दोन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सरकारने कॅबिनेट समन्वय समितीची स्थापना केली असून या समितीत महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या प्रमुख तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी दोन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असणार आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात तसेच अशोक चव्हाण यांचा समावेश या समितीत असणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार आणि जयंत पाटील यांचा समावेश असणार … Read more

आपचा आमदार फुटला, राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, दिल्ली अभी दूर नहीं…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आम आदमी पक्षावर नाराज असलेले आमदार फतेह सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच कमांडो सुरिंदर सिंह यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या उपस्थितीत आमदार फतेहसिंह आणि कमांडो सुरिंदरसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात … Read more

जयंत पाटलांकडे जलसंपदा खाते आल्याने सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण करण्याचे आव्हान

राज्याचे जलसंपदा खाते जयंत पाटील यांच्याकडे आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या असून ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डे या योजनांच्या पुर्ततेला आता गती येईल. जतच्या ४२ गावांचा प्रश्न मार्गी लागले, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजारामबापूंच्या पावलावर पाऊल ठेवून ते या योजनांसाठी ५ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतो.

फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटींचा घोळ; ‘कॅग’च्या अहवालातील माहिती

आमचं सरकार हे काही चौकशी  सरकार नाहीं. परंतु जे कॅग ने म्हटले आहे त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. कारण जे रेकॉर्डवर दिसत आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.