Wednesday, February 1, 2023

परदेशातील प्रवाशांना होम क्वॉरंटाईनची सक्ती – जयंत पाटील

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील परदेश प्रवास, दौरा करून आलेल्या परंतू करोना विषाणूची लक्षणे नसलेल्या व्यक्तींना होम क्वॉरंटाईनच्या सक्तीचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या आठ हॉस्पिटलमध्ये ८६ बेडची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात करोनाच्याबाबत उपाययोजनांच्या बैठकीनंतर पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते.

- Advertisement -

यावेळी सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांचीही उपस्थिती होती. पालक मंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील अनेक जण परदेशात कार्यरत आहेत. याशिवाय काहीजण पर्यटनासाठी बाहेर गेले होते. जिल्हामध्ये २६ देशातून प्रवासी आले आहेत आतापर्यंत जिल्ह्यात १९१ प्रवासी दाखल झाले आहेत त्यापैकी ११ प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. १४ दिवसांनंतर अकराही प्रवाशांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये कोरोना बाबतचा पॉझिटिव्ह अहवाल असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचा एकही करण्याचा रुग्ण आढळलेला नाही, मात्र जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. होम क्वॉरंटाईनच्या नावाखाली बाहेर फिरणार्‍या प्रवाशांना विलगीकरण कक्षात नेण्यात यावे, असेच सक्तीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले, असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

सध्या करोना या विषाणूजन्य आजार पसरू नये, याबाबतची सर्वत्र दक्षता घेतली जात आहे. काही राजकीय पक्षांनी बैठका आयोजित केल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील पक्षांनी गांभीर्याने घेऊन बैठका रद्द कराव्यात. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अथवा काँग्रेस असो. कोणताही पक्ष असू दे. सर्व पक्षांना नियम सारखेच असल्याचेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील  ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –

मोठी बातमी! तब्बल ४५१ भारतीयांना झाली आहे कोरोनाची लागण, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

करोनामुळं सोने बाजारावर संक्रांत; ७५ टक्के मागणी घटली

करोनानं रस्त्यावर थुंकणं केलं महाग; भरावा लागणार १००० रुपये दंड

कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद

दक्षता! केवळ १ रुपयात थर्मल स्क्रिनिंगद्वारे करा तापाची चाचणी

राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग