कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तांची कराडला भेट

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी शनिवारी कराडला भेट दिली. यावेळी आयुक्त म्हैसकर यांनी शासकीय विश्रामगृहात प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेऊन काही महत्वपूर्ण सूचनाही केल्या आहेत. https://hellomaharashtra.in/maharashtra-news/how-karad-corona-patients-reached-upto-57-karad-corona-news/ कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. एकट्या कराड तालुक्यात कोरोनाचे तब्ब्ल … Read more

चिंता वाढत आहे! देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ६० हजारांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचत आहे. सुरुवातीला धीम्या गतीनं वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा आता झपाट्यानं वाढू लागला आहे. अर्थात देशाच्या काही भागांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे हे नाकारता येणार नाही. असं असलं, तरीही रुग्णांचा वाढता आकडा हा देशाचा वाढता धोका अधोरेखित करत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने … Read more

कृष्णा रुग्णालयातील आणखी 6 रुग्ण कोरोनामुक्त ; रुग्णांना पुष्पगुच्छ देवून निरोप

सातारा प्रतिनिधी | कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्सनी केलेल्या उपचारामुळे आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. कृष्णा रुग्णालयातील कोरोनाचे 6 रुग्ण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या सहा जणांचे डॉक्टर्स, नर्स यांनी टाळ्या वाजवून पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आहे. अशी माहिती डॉ. सुरेश … Read more

उपासमारीने बेशुद्ध पडली होती महिला…कराड पोलिसांनी जे केलं ते पाहून तुम्हीही म्हणाल..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी तीन-चार दिवस उपाशीपोटी कराडमध्ये फिरणाऱ्या एका वृद्ध महिलेला कराड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार मारूती चव्हाण आणि सहकारी पोलिसांनी आज तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले. विमल बाबासाहेब आटोळे (वय ६५, रा. कोळे, ता. कराड), असे त्या महिलेचे नाव आहे. लॉकडाऊन मध्ये अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात कराड पोलिसांनी … Read more

कराड येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह; 134 जण विलगीकरण कक्षात दाखल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील एका निकट सहवासिताचा अहवाल कोरोना बाधित (कोविड-19 ) आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 13, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 83, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 145, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 3 असे एकूण … Read more

सातारा जिल्ह्यात संध्याकाळी पुन्हा 2 नवे कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या 114 वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सकाळी कराड येथे 2 आणि सातारा येथ 1 जण असे एकूण ३ कोरोना पोझिटीव्ह रुग्ण सापडले होते. त्यानंतर दुपारी कराड येथे 12 आणि सातारा येथे 5 असे 17 जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर आता संध्याकाळीही जिल्ह्यात दोन … Read more

कोरोनाग्रस्त महिलेला रुग्णालयात चालत जावं लागण्यावर गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई म्हणतात..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोनाग्रस्त महिलेला रुग्णालयात पायी चालत नेल्याचा धक्कादायक प्रकार कराड येथे गुरुवारी दुपारी घडला. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजाच्या अनेक स्तरांतून यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. आता राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत कोण दोषी आहे याबाबत शोध घेण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना … Read more

कराड तालुक्यात पुन्हा 12 नवे कोरोनाग्रस्त, साताऱ्यातील 6 कैदीही पॉजिटीव्ह; जिल्ह्यातील रुग्णसंख्या 113 वर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नुकतेच कराड तालुक्यात पुन्हा 12 आणि सातारा येथे 6 अशा एकूण 12 जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये सातारा येथील सहा कैद्यांचा समावेश असल्याचे समजत आहे. आज सकाळी कराड तालुक्यात 2 आणि … Read more

कराड तालुक्यात कोरोना कसा फोफावला? जाणून घ्या पहिल्या रुग्णापासून आज पर्यंतचा पूर्ण प्रवास

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्याने नेहमीच राज्याच्या राजकीय, सामाजिक, वैचारिक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. या तालुक्याने आजपर्यंत महाराष्ट्राला दोन खंदे मुख्यमंत्री दिले आहेत. खाशाबा जाधवांसारखे ऑलंम्पिकवीर दिले आहेत. मात्र आज कराड तालुका राज्यभरात चर्चेत आहे तो वाढत्या कोरोना रुग्णांमुळे. कराड तालुक्यात कोरोना कसा फोफावला हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र … Read more

सातारा जिल्ह्यात आणखी ३ जण कोरोना पोझिटिव्ह; एकुण रुग्णसंख्या ९५ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सकाळी कराड येथे २ तर सातारा इथे १ असे एकुण ३ जणांचे कोविड १९ अहवाल पोझिटिव्ह आले आहे. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणारी २ वर्षीय मुलगी व ६८ वर्षीय पुरुष तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे … Read more