शरद म्हणतात,’अभी तो मैं जवान हूँ ‘

कोल्हापूर प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाची शैली सर्वश्रुत आहे. याचीच प्रचिती काल आली ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या त्यांच्या सभेमध्ये. काही दिवसांपूर्वी एका पत्रकारावर रागावलेले पवार संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने पाहिले. पण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये पवारांनी अशी दोन वक्तव्य केली की … Read more

महापालिकेच्या गाळ्यांचे भाडे ‘रेडी रेकनर’ प्रमाणेच – कोल्हापूर महापालिका

कोल्हापूर प्रतिनिधी। महानगरपालिकेच्या गाळ्यांचे भाडे आकारणी करण्याची तरतूद कायद्यामध्ये नमूद आहे. तसेच मुदतवाढी संदर्भातील शासन निर्णय कायद्यातील प्रक्रियेनुसार पारित झाला असून, सदर शासन निर्णय महानगरपालिकेवर गाळे धारकांवर बंधनकारक आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पाचवे कनिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश ए. एस. गरड यांनी गाळे धारकांचे दावे गुणदोषांवर नामंजूर केले आहेत. त्यामुळे गाळे धारकांना यापुढे … Read more

‘जेल’ मधून येणार कोल्हापूरच्या अंबाबाईचा लाडू प्रसाद

कोल्हापूर प्रतिनिधी । (स्पेशल रिपोर्ट) साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचे असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई या देवस्थानची जगभर ओळख आहे. ‘नवरात्र उत्सव’ म्हटलं की इथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. येत्या रविवारपासून नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे. या निमित्त देवस्थान समिती आणि श्री पूजकांची त्यांच्या पातळीवर तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे देवीच्या दर्शनासाठी … Read more

मग… मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करा – राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘शरद पवार यांच्यावर झालेल्या ईडी च्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल नक्की कारवाई झाली पाहिजे या मताशी मी सहमत आहे. त्यामुळे जसा पवारांवर गुन्हा दाखल झाला तसाच चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे.’ असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद यांच्यावर … Read more

तीन टप्प्यातील ‘एफ.आर.पी’ च्या वक्तव्याबाबत शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांना विचारला जाब

कोल्हापूर प्रतिनिधी । साखर आयुक्तांच्या तीन टप्प्यातील एफ आर पी च्या वक्तव्याचा जाब शेतकरी संघटनांकडून साखर आयुक्तांना आज विचारण्यात आला. तसेच थकीत एफ आर पी आणि 15% व्याज दिल्याशिवाय या हंगामात कोणत्याही कारखान्यास गाळप परवाने देऊ नयेत अशी विनंती आज जय शिवराय किसान मोर्चा आणि बळीराजा शेतकरी संघटना यांच्या प्रमुखांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना … Read more

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वंचित सोबत जाणार?

कोल्हापूर प्रतिनिधी। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत माजी मंत्री प्रकाश आवडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन नव्या राजकीय घरोब्याची तयारी सुरू केली आहे. उभय नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास बंद खोलीत खलबते झाली. मात्र, चर्चेविषयी माहिती देण्यात आली नाही. इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले या तीन मतदारसंघात आवाडे गटाची लक्षणीय ताकद आहे. त्या … Read more

‘भाकप’ तर्फे कोल्हापूर उत्तरसाठी उमेदवार जाहीर

कोल्हापूर प्रतिनिधी। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सतीशचंद्र कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार आज जाहीर करण्यात आला आहे. युती सरकारने शेतकरी, विद्यार्थी, अल्पसंख्यांक, दलित महिला आणि असंघटित कामगार यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलं आहे. ‘विरोधी पक्ष कमकुवत ठरल्याने सक्षम पर्याय म्हणून भारतीय … Read more

कर्नाटक सीमा भागात १४ ठिकाणी नाकाबंदी, पोलीस दल निवडणुकांसाठी सज्ज

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील भांगात विशेष दक्षता घेणारी पाऊल उचलण्यात अली आहेत. त्यानुसार ‘ सीमावर्ती भांगातून रक्कम घेऊन जात असताना 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यासोबत पुरावा म्हणून आवश्यक ती कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अन्यथा अशी संशयीत रक्कम आयकर विभागाकडे वर्ग … Read more

कॉ. पानसरे हत्या प्रकरण ; शार्प शूटर अंदुरेसह मिस्किन ,बद्दी यांना न्यायालयीन कोठडी

कोल्हापूर प्रतिनिधी। कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूर एसआयटीने अटक केलेल्या तिघा संशयीताना शुक्रवारी सकाळी जिल्हा न्यायालयात हजर केले. नववे सत्र न्यायाधिश एस. एस. राऊळ यांनी तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सायंकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुणे व मुंबईला रवानगी करण्यात आली. सचिन प्रकाशराव अंदुरे (वय ३२, रा. जैन मंदिराजवळ, राजबाजार, जि. औरंगाबाद), अमित रामचंद्र … Read more

‘शेतकऱ्यांनो एक दमडीही कर्ज भरायचं नाही’ – रघुनाथदादा पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘हमीभावास 50 टक्के कात्री लावून सरकारने वर्षाला 50 हजार कोटींचा शेतकऱ्यांवर दरोडा टाकला आहे. त्यामुळे सरकारवरच शेतकऱ्यांचे देणे लागत आहे, आम्ही खऱ्या अर्थाने कर्जदार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला 20 वर्षापूर्वीच कर्जमुक्ती दिल्याने एक दमडीही भरायची नाही,’ असे आवाहन शेतकरी संघटनेत नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले. कोल्हापुरात झालेल्या कर्जमुक्त परिषदेत हा निर्धार करण्यात आला. … Read more