BREKING NEWS : गोकुळ निवडणूकीत विरोधी आघाडीचे सुजित मिनचेकर आणि अमर पाटील विजयी

Gokul Kolhapur

कोल्हापूर | बहुप्रतीक्षित गोकुळ दूध संघाची मतमोजणी सुरू झाली असून गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता येणार हे दुपारपर्यंत कळणार आहे. गोकुळसाठी रविवारी चुरशीने 99.78 टक्के इतकं झालं आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे सुजित मिनचेकर 346 आणि अमर पाटील 436 मतांनी विजयी झाले आहेत. तर महिला प्रवर्गात सत्ताधारी गटाच्या शोमिका महाडिक … Read more

महाराष्ट्राची स्फूर्तीगीते गात मोठ्या उत्साहात घरीच साजरा केला महाराष्ट्र दिन

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार शालेय विद्यार्थ्यांसाठी १ मे म्हणजे शालेय शैक्षणिक वर्षातील निकालाचा दिवस, आनंदाचा दिवस असतो. परंतु कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे यावर्षी विना परीक्षा सरसकट विद्यार्थ्यांना उतीर्ण करण्यात आले असून तो निकाल ऑनलाइन पध्दतीने विद्यार्थ्यांपर्यंत कळविण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्याचा 61 वा महाराष्ट्र दिन शारदा रवींद्र जोशी या विद्यार्थींनीने घरीच साजरा केला … Read more

गोकूळची निवडणूक होणारच ! कोरोनाग्रस्त ठरावदार पीपीई कीट घालून मतदान करणार ः पालकमंत्री

Gokul Kolhapur

कोल्हापूर | सत्ताधारी गटाने निवडणूक रद्द करण्यासाठी कोर्टाची पायरी चढली होती. तेव्हा आता सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरून निवडणूक लढवावी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक होणारच आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व अटी- शर्थीचे पालन करून 35 ऐवजी 70 केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. तसेच ज्यांना कोरोना झाला आहे, अशा ठरावदार  पीपीई कीट घालून … Read more

भाविकांविना…जोतिबांच्या नावानं चागंभलं, दख्यनच्या राजा जोतिबा देवाची चैत्र यात्रा कडक बंदोबस्तात पार

कोल्हापूर | श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता. परंतु आजच्या दिवशी डोंगरावर पोलिसांशिवाय कोणीही उपस्थित नव्हेत. यात्रेतील पालखी सोहळा केवळ २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत कडक बंदोबस्तात पार पडला. सांयकाळी पाच वाजता देवाची पालखी विविधरंगी फुलांनी सजविण्यात आली. मंदिर परिसरात सहा वाजून एक मिनटांनी प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी … Read more

मोठी बातमी! कोल्हापूर येथे होणार 2021 ची सैन्य भरती रद्द

Army

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर येथे होणारी सैन्य भरती कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे. याबाबत भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. सैन्य भरतीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह कोकण व गोवा राज्यातील सैन्य भरतीचे अर्ज भरणाऱ्यांना या भरतीला मुकावे लागणार आहे. कोल्हापूर येते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यातील … Read more

ट्रक चालकांस लुबाडणाऱ्या तोतया तहसिलदारास पोलिस कोठडी

Crime

कोल्हापूर | तहसीलदार असल्याचा बनाव करून चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास अडवून मारहाण करून लुबाडणाऱ्या तोतया तहसिलदारांसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उंब्रज (ता. कराड) येथील ट्रक चालकांस नथुराम कांबळे ( रा. कोळगाव, ता. शाहूवाडी) व त्याचा साथीदार विष्णु विठ्ठल पारवे (रा. असेगाव … Read more

खरीपाचे गावनिहाय नियोजनासाठी कृषी समितीची स्थापना

कोल्हापूर | खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी ग्रामस्तरीय कृषी समितीची स्थापना करण्यात येत असून संपूर्ण गावाची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन गावाचे तालुक्याचे जिल्हावार नियोजन प्रस्तावित आहे. सर्व पालकमंत्र्यांकडे नियोजन आल्यानंतर सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येणार आहे. यावर चर्चा करण्यासाठी कृषी अधिकारी पातळीवर आम्ही बैठक घेत आहोत अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. राज्यातील कृषी … Read more

Breaking News : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त; भाजपला दणका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचा अध्यक्ष असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती बरखास्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पाश्वंभूमीवर भाजपला हा मोठा दणका बसला आहे. राज्य सरकारने नुकताच अद्यादेश जिल्हाधिकारी देसाई यांच्याकडे पाठवला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पश्चिम … Read more

तरूणांकडून मगरीच्या तावडीतून कालवडीची सुटका

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार शिराळा तालुक्यातील मांगले व पन्हाळा तालुक्यातील सातवे या गावच्या दरम्यान असलेल्या वारणा आणि कडवी नदीच्या संगमाजवळ मगरीने एक वर्षाच्या कालवडीवर बुधवारी सकाळी हल्ला केल्याची घटना घडली आहे. नदीवर जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या बाजीराव शेवडे या तरुणाने धाडसाने मगरीच्या तावडीतून कालवडीची सुटका केली. मांगले येथील बाजीराव पांडुरंग शेवडे हे वारणा नदी … Read more

चंद्रकांत पाटलांना चोंबडेपणा करण्याची गरज काय?; हसन मुश्रीफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सध्या चांगलंच टीकेचं रान पेटलं आहे. दोघेही दररोज एकमेकांवर कोणत्याना कोणत्या कारणाने टीका करीत असतात. रविवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. त्यावरून कोल्हापुरात भाजपचे कार्यकर्ते चांगलेच भडकले. त्यानंतर चंद्र्कांत पाटील यांनीही मुश्रीफ यांचा खरफुस समच्छर घेत त्यांना … Read more