भाविकांविना…जोतिबांच्या नावानं चागंभलं, दख्यनच्या राजा जोतिबा देवाची चैत्र यात्रा कडक बंदोबस्तात पार

कोल्हापूर | श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता. परंतु आजच्या दिवशी डोंगरावर पोलिसांशिवाय कोणीही उपस्थित नव्हेत. यात्रेतील पालखी सोहळा केवळ २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत कडक बंदोबस्तात पार पडला. सांयकाळी पाच वाजता देवाची पालखी विविधरंगी फुलांनी सजविण्यात आली.

मंदिर परिसरात सहा वाजून एक मिनटांनी प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. पालखी गजगतीने मूळमाया यमाई मंदीराकडे रवाना झाली. यावेळी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, देवस्थानचे सचिव विजय पवार, अधिक्षक महादेव दिंडे हे उपस्थित होते. पालखी मार्गावर कडक पोलिस बंदोबस्त होता. मार्गावर एकही पुजारी अथवा ग्रामस्थ यांना बाहेर पडू दिले नाही. केवळ सनई, शिंग, ढोल या वाद्यांच्या गजरात पालखी यमाई मंदिराकडे गेली. विविध धार्मिक विधी झाल्यानंतर पुन्हा पालखी मुख्य मंदिरात आली.दरम्यान, कोरोना नियमांमुळे डोंगरावर आज गगनाला भिडणाऱ्या, खांद्यावर डोलणाऱ्या, रंगीबेरंगी सातशे सासनकाठया न्हवत्या. चांगभलचा जयघोष नसल्याने परिसर शांत होता. यात्रेच्या मुख्य दिवशी अख्खा डोंगर सूना राहीला.

जोतिबा डोंगरावर तीन दिवस कडक संचारबंदी…

सोमवारी पहाटे पाच वाजता मुख्य मंदिरात तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. यावेळी देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे यांच्यासह काहीच पुजारी उपस्थित होते. सकाळी राजेशाही थाटातील बैठी आकर्षक महापूजा बांधण्यात आली. दरम्यान १२१ वर्षानंतर भाविकांवीनाच चैत्र यात्रा दुसऱ्यांदा होत आहे. या पूर्वी १८९९ मध्ये प्लेगच्या साथीमुळे डोंगरावर चैत्र यात्रा झाली नव्हती. मंदिर गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून बंद आहे. कोणत्याही बाहेरील भाविकांना मंदिरात प्रवेश नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने चैत्र रद्द केली. दरवर्षी यात्रा काळात डोंगरवर भाविकांची गर्दी, गुलाल-खोबऱ्याची उधळण असायची. परंतु गेल्यावर्षीपासून कोरोनामुळे हे चित्र बदलले आहे. भाविकांविना यात्रा साजऱ्या केल्या जात आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like