भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यासह सात जण तडीपार; चार जिल्ह्यांतील टोळीविरूद्ध २४ गुन्हे दाखल

आष्टा येथील भाजपचे माजी पदाधिकारी प्रवीण माने यांच्यासह सात जणांच्या टोळीवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. सांगलीसह कोल्हापूर, सातारा तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी ही कारवाई करण्यात आली. दत्तात्रय कोळेकर, अनिल गावडे, सचिन रास्कर, काशिनाथ ढोले, शोएब सनदी आणि उमेश रास्कर अशी टोळीतील अन्य गुन्हेगारांची नावे आहेत.

शहीद जवान जोतीबा चौगुले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

खासदार संजय मंडलीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पार्थिवाला पुष्पचक्र वाहिले. जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

कोल्हापूरमध्ये ४९ व्या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन; हजारो रंगबिरंगी फुले नागरिकांच्या भेटीला

कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर गार्डन क्लबच्यावतीने ४९ व्या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन कोल्हापुरात करण्यात आलं आहे.

गावात बस येत नसल्याने विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखाच्या केबिनमध्येचं भरवले कॉलेज

कोल्हापुरातील शाहू मैदान ते नंदगाव या मार्गावरून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. तसेच अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागतं. मात्र गावात बसचं येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखाच्या कार्यालयातच कॉलेज भरवत अनोखं आंदोलन केलं आहे. संभाजी ब्रिगेडच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आलं.

…अन कोल्हापूरकरांनी केला खड्ड्यांचा वाढदिवस साजरा

रस्त्यावर काढलेली पांढरी रांगोळी भोवताली पसरलेल्या फुलांच्या पाकळ्या या सगळ्याकडे पाहून आपल्याला वाटेल कि इथं कुंचही तरी मिरवणूक येणार आहे. पण हि मिरवणूक नसून

कोल्हापूर जिल्ह्यात १२ खासगी सावकारांच्या घरांवर छापे

जिल्ह्यातील १६ खासगी सावकारांच्या घरावर गुरुवारी दिनांक १२ रोजी सकाळी पोलसांनी छापे टाकले. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली  आहे. तर जिल्ह्यातील इतर सावकारांचे मात्र धाबे दणाणले आहेत. हि कारवाई पुढील तीन दिवस सुरू राहणार असल्याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर सुरु आहे.

बापाने पुरवला लेकीचा संसदवारीचा हट्ट! खासदार धैर्यशिल मानेंच्या मुलीने घेतल्या बड्या नेत्यांच्या भेटी

हानपणी आपण कधी आपल्या वडिलांना त्यांच्या कामाच्या जागी घेऊन जा म्हणून हट्ट केला असेल. काहींचा हा हट्ट पुरवला गेलाही असेल. अशावेळी आपले वडील जेथे काम करतात तेथे काम करणाऱ्या सगळ्यांनी काहींचे लाड सुद्धा पुरवले असतील. तुम्हाला कौतूकाने जवळ घेतलं असेल.अशी एक आठवण तुमच्याही आयुष्यात असणानारच. आपल्या लेकीच्या आयुष्यातला असाच काहीसा प्रसंग शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी सोशल फेसबुकवर शेयर केला.

गोवा बनावट मद्यासह १० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला. आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिलारीनगर येथील वीज निर्मिती कार्यालयासमोरील शेतवडी इथं काही जणांची संशास्पद हालचाल दिसून आली. पथकातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा घातला असता तेथे एक महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप थांबलेली दिसून आली.

कडकनाथ घोटाळा प्रकरण; रॅली धडकणार मंत्रालयावर

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातील घोटाळ्याप्रकरणी गुंतवणूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी बेळगाव येथून मोटारसायकल रॅली मोर्चा काढण्यात आला आहे. कोल्हापूर-सातारा-पुणे मार्गे हा मोर्चा शुक्रवार, दि. 13 रोजी मंत्रालयावर धडकणार आहे. 

सहलीसाठी आलेल्या विद्यार्थिनींच्या बसला अपघात; ११ विद्यार्थिनींसह ३ शिक्षक जखमी

चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस  रस्त्याच्या कडेला असलेल्या घड्ड्यात गेली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.