होळीमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रतिकृतीचे दहन ; सांगलीत होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा
सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने मंगळवारी सायंकाळी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने मंगळवारी सायंकाळी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कोरोना व्हायरसने देशासहित आता पुण्यात ही धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील पाच जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे आता पुण्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.
मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार जोतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. दुपारी 12.30 वाजता होणारा हा प्रवेश दुपारी 2.55 ला घेण्यात आला.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पैठण येथील श्रीनाथ षष्ठी महोत्सवाला स्थगिती देण्यात आली आहे. असा अध्यादेश आज (दि.10) जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत मंगळवार, दि. १० मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १७ लाख ३२ हजार ८३३ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११०६९.१५ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
वर्षभर अभ्यास करूनही इंग्रजीच्या पेपरला जाताना विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात धाकधूक असते. मुलांच्या मनातील इंग्रजीची भीती घालविण्यासाठी तसेच उत्साहपूर्ण वातावरणात पेपर सोडविण्यासाठी गारखेडा परिसरातील कन्या विद्यालय केंद्रात कॉफिमुक्त अभियान उपक्रम राबविण्यात आला. परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. # Hello Maharashtra
मनसेचे माजी आ.हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यामुळे हर्षवधन जाधव यांच्या अडचनीत वाढ झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथील काळे वस्तीवरील सोनल राजेंद्र तळेकर ही भारतीय सैन्य दलात भरती झाली आहे. सोनल तळेकर हिची केंद्रीय राखीव दलात निवड झाली असून सोनल ही केम गावामधून सैन्यात भरती होणारी पहिली मुलगी आहे. त्यामुळे तिचे गावामधून विशेष कौतुक होत आहे.#Hello Maharashtra
मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे निष्ठावान राहिलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मध्यप्रदेशच्या राजकारणात खळबळ माजलेली असताना ज्योतिरादित्य यांच्या पक्षात नसण्याचा काही परिणाम होणार नाही.
दक्षिण भारतीय स्टार कमल हासन हे ‘इंडियन -२’ चित्रपटाच्या अपघातासंदर्भात चौकशीसाठी चेन्नईचे पोलिस आयुक्त यांच्याकडे 03 मार्च रोजी हजर झाले आहेत. १ फेब्रुवारीला ‘इंडियन -२’ चित्रपटाच्या सेटवर क्रेन कोसळल्याने जवळपास तीन जणांचा मृत्यू आणि दहा जण जखमी झाले होते.