क्रिकेट खेळताना बॅट्समनचा मृत्यू; स्पर्धा सुरु असताना आला हृदयविकाराचा झटका

पुणे | जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा हृदयविकाराचा झटका येऊन मैदानावर मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून क्रिडा प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे घडली आहे. या खेळाडूचा मृत्यू झाल्याची पूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. … Read more

सैन्यातील जवानाला ऑनलाईन अडीच लाखांचा गंडा

Cyber Crime

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जत शहरातीत मोरे कॉलनी येथे राहत असलेले चंद्रशेखर कदम यांची ऑनलाईन पध्दतीने 2 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबतची फिर्याद चंद्रशेखर कदम यांनी जत पोलीस ठाण्यात दिली. चंद्रशेखर कदम हे अरुणाचल प्रदेश येथे भारतीय सैन्यात दलात कार्यरत आहेत. सुट्टीमध्ये ते आपल्या जत या गावी आले होते. … Read more

राजीनामा तर घेतला चौकशीचे काय? न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, मुख्यमंत्र्यांना बंजारा समाजाचा सवाल!

बीड प्रतिनिधी | शेख अनवर संपूर्ण महाराष्ट्रात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजकारण व समाजकारण तापलेले असताना. शेवटी संजय राठोड या मंत्र्यांनी राजीनामा तर दिला. पण तो फक्त राजीनामा देऊन भागणार नाही. त्यासाठी निपक्ष व न्यायिक चौकशी व्हायला पाहिजे. तेव्हाच सत्य बाहेर येईल पूजा चव्हाण यांच्या कुटुंबास खरा न्याय मिळेल. असे प्रतिपादन बंजारा समाजाच्या वतीने माजलगाव … Read more

सावधान ! बीडमध्ये कोरोना चाचण्या अत्यल्प, केवळ २०३ जणांच्या तपासणीत २८ पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र | शेख अनवर राज्यभरातील काही शहरात कोरोना झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा शासन-प्रशासन व्यवस्थेसह सर्वसामान्यांची चिंता वाढली असून जास्तीत जास्त कोरोना तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या कमी होत असल्याची खंत आयुक्तांनी व्यक्त केली असतानाच काल केवळ २०३ संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २८ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले … Read more

हाँगकाँगमध्ये विकले गेले आशियातील सर्वात महागडे अपार्टमेंट, याची किंमत किती आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । हाँगकाँगमधील एक अपार्टमेंट 430 कोटींमध्ये विकले गेले आहे. यामुळे हे आशियातील सर्वात महागडे अपार्टमेंट बनले आहे. हाँगकाँगचा टायकून व्हिक्टर लीच्या सीके एसेट होल्डिंग्ज लिमिटेडने 21 बोराट रोड प्रकल्पात हे अपार्टमेंट विकले आहे. खरेदीकरणाऱ्याची ओळख अद्याप जाहीर केली गेलेली नाही. हाँगकाँग आपल्या महागड्या अपार्टमेंटसाठी लोकप्रिय आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या काळातही एका व्यावसायिकाने आशियातील सर्वात … Read more

धक्कादायक! 700 प्रवाश्यांनी भरलेले एक जहाज कांगो नदीमध्ये पलटले! अनेकांना मिळाली जलसमाधी

काँगो | सोमवारी रात्री डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये सातशे प्रवाशांनी भरलेले जहाज पलटी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमधे आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जहाजातून प्रवास करणाऱ्या सातशे प्रवाशांपैकी 300 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. तर इतर प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. जहाजामधून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले … Read more

…म्हणून क्रोध आणि अहंकारवाढीच्या काळात साने गुरुजी वाचणं मला जास्त गरजेचं वाटतं..!!

थर्ड अँगल | सुमित वाघमारे साने गुरुजी यांच्याबाबत माझे वाचन कमी आहे. श्यामची आई लहान असताना वाचली. त्यातले बरेचसे आज पटत नाही. पण एक वाक्य आजही आठवते – पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस, तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम! दुसरी आठवण डॉ. दाभोलकर यांच्या संदर्भाने आहे. मी अगदीच लहान असताना … Read more

लवकरच आणखी 4 बँकांचे होऊ शकेल खासगीकरण, याबाबत केंद्राची भूमिका काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली | केंद्र सरकार येत्या काळामध्ये अजून चार बँकांचे खाजगीकरण करू शकते. लाईव्हमिंटने दिलेल्या बातमीनुसार, पुढील टप्प्यात सरकारने खाजगीकरणाच्या राज्य संचलित बँकाची निवड केली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हीसिस बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली आहे. सरकार सध्या खासगीकरणाकडे जास्त भर देत असून, … Read more

डेअरी व्यवसायाकरिता देशभर फिरण्यासाठी विकत घेतले चक्क हेलिकॉप्टर !

भिवंडी | महाराष्ट्रामधील भिवंडी येथील एका उद्योजक शेतकऱ्याने आपल्या डेअरी व्यवसाय वाढीसाठी, देशभर करण्याकरिता हेलिकॉप्टर विकत घेतले आहे. जनार्दन भोईर असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी नुकताच डेअरी व्यवसाय सुरू केला आहे. भोईर यांचा शेतीसह बांधकामाचा व्यवसाय सुद्धा आहे. डेरी व्यवसायाच्या वाढीसाठी देश यात्रा करावी लागत असल्यामुळे यात्रा सुखकर व्हावी यासाठी 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर विकत … Read more

आश्चर्यकारक ! लाच घेणाऱ्या आरोपीला न्यायाधीशांनी स्वतःशी लग्न करण्याच्या अटीवर दिला जामीन!

जयपूर | जयपुर या शहरामध्ये एक भ्रष्टाचाराची केस सर्व नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या शहरामध्ये एका अधिकाऱ्याने लाच घेतल्यानंतर त्या प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. लाच घेणारी एक महिला अधिकारी असून, त्यांनी लाच घेतल्यानंतर त्यांच्यावर केस करण्यात आली होती. ही केस ज्या न्यायालयात सुनवायीसाठी होती, त्या न्यायालयातील न्यायाधीशांची आणि लाचखोर महिला अधिकार्‍याचे प्रेम … Read more