आश्चर्यकारक ! लाच घेणाऱ्या आरोपीला न्यायाधीशांनी स्वतःशी लग्न करण्याच्या अटीवर दिला जामीन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर | जयपुर या शहरामध्ये एक भ्रष्टाचाराची केस सर्व नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या शहरामध्ये एका अधिकाऱ्याने लाच घेतल्यानंतर त्या प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. लाच घेणारी एक महिला अधिकारी असून, त्यांनी लाच घेतल्यानंतर त्यांच्यावर केस करण्यात आली होती. ही केस ज्या न्यायालयात सुनवायीसाठी होती, त्या न्यायालयातील न्यायाधीशांची आणि लाचखोर महिला अधिकार्‍याचे प्रेम जमले. आणि न्यायाधीशांनी त्यासाठी आरोपी महिलेला लग्नासाठी जामीनही दिला आहे.

जयपूरमधील उपविभागीय न्यायाधीश पिंकी मीना यांच्यावर लाच घेतल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर हायवे बनवणाऱ्या कंपनीकडून दहा लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. त्या आरोपाखाली सध्या तुरुंगात आहेत. पिंकी मीना या 16 फेब्रुवारीला त्यांच्यावर चालू असलेल्या खटल्याच्या न्यायाधीशांच्या सोबतच लग्न करणार आहेत. त्याच्यावर सध्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या जयपूर खंडपीठामध्ये खटला सुरू आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या जयपुर खंडपीठाचे न्यायाधीश इंद्रजीत सिंह यांनी पिंकी मीना यांना लग्नासाठी दहा दिवसांचा सशर्त जामीन दिला आहे.

पिंकी मीना यांना लग्नाच्या पाच दिवसांनंतर म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी परत सरेंडर करावे लागेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 फेब्रुवारीला होणार आहे. पिंकी यांनी यापूर्वी खालच्या न्यायालयातही जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यासाठी नकार दिला. त्यानंतर त्यांना उच्च न्यायालयातून लग्नाच्या सहा दिवसआधी लग्नासाठी जामीन मिळाला आहे. मीना या पहिल्याच प्रयत्नांमध्ये आरएएस म्हणजेच राजस्थान प्रशासकीय सेवेच्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊन अधिकारी झाल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment