राजीनामा तर घेतला चौकशीचे काय? न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, मुख्यमंत्र्यांना बंजारा समाजाचा सवाल!

बीड प्रतिनिधी | शेख अनवर

संपूर्ण महाराष्ट्रात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजकारण व समाजकारण तापलेले असताना. शेवटी संजय राठोड या मंत्र्यांनी राजीनामा तर दिला. पण तो फक्त राजीनामा देऊन भागणार नाही. त्यासाठी निपक्ष व न्यायिक चौकशी व्हायला पाहिजे. तेव्हाच सत्य बाहेर येईल पूजा चव्हाण यांच्या कुटुंबास खरा न्याय मिळेल. असे प्रतिपादन बंजारा समाजाच्या वतीने माजलगाव तालुका अध्यक्ष राजेश राठोड यांनी केले.

राजेश राठोड पुढे असेही म्हणाले की, आत्महत्येची न्यायिक चौकशी व्हावी. गुन्हेगाराला सजा झालीच पाहिजे. अन्यथा लोकांचा न्याय व सरकारवरून भरोसा उठेल. अश्याचप्रकारेच प्रत्येक समाजातील महिलांना आपला जीव गमवावा लागेल. तसेच त्या कुटुंबातील लोकांना जीव असाच जळत राहील. गुन्हेगारांना सजा झाली नाही तर ते फक्त राजीनामा देऊन असच समाजामध्ये उजळ माथ्याने निर्लज्जपणे फिरतील, व पूजा चव्हाण यांच्या सारख्या निष्पाप मुलींना असाच आपला जीव गमवावा लागेल.

म्हणून महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना बंजारा समाजाच्या वतीने विनंती आहे. की ज्या प्रमाणे लवकर ॲक्शन घेत सदरील मंत्र्याचा राजीनामा घेतला. त्याच प्रमाणे लवकर त्यांची न्यायिक चौकशी करून गुन्हेगार असल्यास गुन्हा दाखल करावा. अन्यथा संपूर्ण बंजारा समाज पेटून उठेल व फक्त राज्य सरकार यास जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like