राज्यात आत्तापर्यंत ८१९ पोलीस कोरोनाबाधित, ७ जणांचा मृत्यू – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । कोरोनाच्या लढाईत फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या पोलिसांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आत्तपार्यंत ८१९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करुन आत्तापर्यंत ४ कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख … Read more

महिलेने ५०० कि.मी. पायी चालल्यानंतर एका झाडाखाली दिला बाळाला जन्म

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात एका परप्रांतीय महिलेने मध्य प्रदेशपासून ५०० कि.मी. अंतर प्रवास करून एका झाडाखाली बाळाला जन्म दिला. सदर महिलेसह आणखी एक डझन लोक अनेक दिवसांपासून मध्य प्रदेशातील धार येथून चालत होते आणि ५२० कि.मी. अंतरावर गेल्यानंतर तिला सोमवारी बालाभेत गावात बाळंतपणाचा त्रास झाला. प्रवासाला निघाली तेव्हा ती साडेआठ महिन्यांची … Read more

लॉकडाउनमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकीत; महामंडळाला हवेत ३०० कोटी

मुंबई । लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात सध्या अविरतपणे परप्रांतीय मजूर, विद्यार्थी यांची ने आण करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार मात्र धोक्यात आहेत. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं दर दिवशी २१ कोटींचं नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला ३०० कोटींची मदत द्या, नाही तर एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल-मे महिन्यांचे पगार देणं कठीण होईल, अशी मागणी इंटकने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली … Read more

आंतरराष्ट्रीय नर्स डेनिमित्त विराट कोहलीने नर्सेसचे मानले आभार म्हणाला,”या कठीण काळात साथ दिल्याबद्दल धन्यवाद”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोनाव्हायरस या साथीच्या आजाराने झगडत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देशाने स्वत:ला लॉकडाऊनमध्ये टाकले आहे आणि शाळा-कार्यालयापासून ते संपूर्ण क्रीडा विश्‍व थांबले आहे. परंतु डॉक्टर व परिचारिका हे मात्र सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णालयात जात आहेत. आज आंतरराष्ट्रीय नर्स डे आहे, या निमित्ताने भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्व … Read more

लाॅकडाउनबाबात होणार मोठी घोषणा? पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता लाईव्ह

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आत वाजता पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी लोकडाऊन चा कालावधी पुन्हा काही दिवस वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या देशात एकूण ७० हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून लोकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. … Read more

अभिनेता,मॉडेल-फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणच्या ‘सुपरमॅन पुशअप्स’ने चाहत्यांना केले हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता, मॉडेल-फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणने फिट राहण्यासाठी लोकांना एक नवीन आव्हान दिले आहे. त्याने वर्कआऊटबद्दल एक छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये तो हवेत पुश-अप करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “तो नवीन हालचाली करण्याचा प्रयत्न करीत आहे. जर तुम्ही प्रयत्न केला तर काळजीपूर्वक करा आणि … Read more

लॉकडाउन कायम ठेवा! परंतु..; उद्धव ठाकरेंनी केली मोदींकडे ‘ही’ मागणी

मुंबई । लॉकडाउन कायम ठेवत काही निर्बंध शिथील करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांनी राज्यात पोलिसांना विश्रांती देण्याची गरज असून केंद्रीय पोलीस दलाला राज्यात पाठवावं अशी विनंती पंतप्रधानांकडे केली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा येत्या १७ मेला संपत असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

अखेर मोदी सरकारने उचलले ते पाऊल ज्याची सर्वजण वाट पाहत होते; काँग्रेसही म्हणाले हे बरोबर केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सोमवारी कोरोनोव्हायरसच्या लॉकडाऊन दरम्यान प्रवासी रेल्वेगाड्या १२ मेपासून सुरू करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. चिदंबरम यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतुकीसह किरकोळ वाहतूक सुरू केली पाहिजे.” ते म्हणाले की प्रवासी आणि वस्तूंसाठी रस्ता, रेल्वे आणि … Read more

दिल्लीत अडकलेल्या युपीएससीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार रेल्वेने परत आणणार

नवी दिल्ली । लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक राज्यांत मजूर, विद्यार्थी मोठ्या संख्येने अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयं बंद असून परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी महाराष्ट्राबाहेर गेलेले अनेक विद्यार्थी विविध राज्यात अडकले आहेत. यात दिल्लीत युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. दिल्लीत युपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेलेले अनेक विद्यार्थी … Read more