पाकिस्तानमध्ये रमजानच्या पहिल्या दिवशीच लोकांच्या बेजबाबदार वागणुकीने सरकारच्या चिंतेत भर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रमजान महिन्यातील कोरोनाव्हायरसच्या साथीमध्ये लोकांच्या वृत्तीमुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या कपाळावर चिंता पसरली आहे. इम्रान सरकारने अनेक मार्गांनी लॉकडाऊन शिथिल केले आणि तरीही इतर लोकांनी नियमांचे उल्लंघन करणे थांबवले नाही,याचा परिणाम असा झाला की, देशात रमजान महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी मशिदी आणि रस्त्यावर लोकांची गर्दी झाली आणि सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा उडाला. हे लक्षात … Read more

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची कोरोनावर मात,पूर्णपणे बरे होऊन केली पुन्हा कामाला सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन कोरोनाव्हायरसवर मात केल्यावर पुन्हा कामावर परतले आहेत. कोविड -१९ ने संसर्ग झालेले जॉन्सन यांनी सोमवारी पुन्हा कार्यालयात येणे सुरू केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ब्रिटिश पंतप्रधान १० डाऊनिंग स्ट्रीटवर परत आले आहेत. वरिष्ठ मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यापूर्वी त्यांनी कोविड -१९ या साथीच्या विषयावर मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची अपेक्षा … Read more

रमजानमध्ये मशिदीत नमाज अदा केल्यानंतर मौलवीला झाली कोविड -१९ ची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण-पश्चिम बांगलादेशातील स्थानिक मशिदीत नमाज पठण करणाऱ्या मौलवीला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. बीडियूझेन २४ च्या वृत्तानुसार, मौलवी यांनी मगुरा जिल्ह्यातील आडंगा गावात मशिदीत शनिवारी रमजानच्या नमाजचे नेतृत्व केले आणि एका दिवसानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. बातमीनुसार, अधिकारी नमाजमध्ये सामील झालेल्या २०-२५ लोकांची यादी … Read more

महसूली तूट भरून काढण्यासाठी श्रीमंतांवर COVID उपकर लावा! कुमारस्वामी यांची मागणी

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन लागू आहे. लॉकडाउनमध्ये सर्व उद्योग-व्यवसाय बंद असल्यामुळे राज्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कर रुपाने महसूल जमा होत नसल्याने अनेक राज्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या होत चालल्या आहेत. लॉकडाऊनमुळे राज्याचे महसुलाचे सर्व स्रोत बंद आहेत. सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. पण अजूनही करोना व्हायरसवर नियंत्रण … Read more

कोरोनापेक्षाही भयानक आहे कच्च्या तेलाच्या किंमती घसरणं! जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगाला केवळ कोरोना साथीचाच सामना करावा लागत नाहीये तर कच्च्या तेलाच्या घटत्या मागणीमुळे भीषण परिस्थितीलाही सामोरे जावे लागत आहेत. नुकतीच अमेरिकेत कच्च्या तेलाची किंमत शून्यावरून खाली गेली आहे. म्हणजे तेल उत्पादक कच्चे तेल देखील देत होते आणि त्याचवेळी प्रति बॅरल ४ डॉलरही देण्यास तयार होते. हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटले असेल, … Read more

कोटा येथील विद्यार्थ्यांची होणार ‘घरवापसी’; राज्य सरकार पाठवणार ९० एसटी बस

मुंबई । कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी हे राजस्थानमधील कोटा येथे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना स्वगृही परत आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पाऊल उचललं आहे. कोटा येथे अडकलेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एकूण ९० एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना … Read more

सलग ४ दिवसांच्या भाववाढी नंतर सोने पडले! जाणुन घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशातील सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत होती.परंतु सलग चार दिवस सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज त्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.जागतिक बाजारातही सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.शुक्रवारच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम २०१ रुपयांची घट झाली आहे,त्यानंतर सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६४०६ वर गेली आहे. दुसरीकडे, … Read more

तापाने फणफणारा तो बांगलादेशातून पोहत आसाममध्ये आला; म्हणाला मला कोरोनातून मुक्त करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे जगभरातील देश त्रस्त झालेले आहेत. अनेक सामर्थ्यवान देशांनी कोरोनासमोर गुडघे टेकले आहेत.अशा संकटाच्या काळात भारत अद्यापही कोरोनाशी झुंज देत आहे. हेच कारण आहे की तापाने ग्रस्त असलेला एक बांगलादेशी तरूण कुशीरा नदीतून पोहत पोहत आसामच्या सीमेवर आला.येथे पोहोचल्यावर त्याने करीमपूर जिल्ह्यातील मुबारकपूर गाठले आणि गावकऱ्यांना सांगितले की, त्याला कोरोना … Read more

पंतप्रधान मोदींनी केलं राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक, म्हणाले..

नवी दिल्ली । देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी पुन्हा एकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवला असल्याचा फायदा झाला असल्याचं सांगत नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. लॉकडाउनसाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा प्रभाव काही प्रमाणात दिसत असून त्याचा फायदा होत असल्याचं … Read more

लुडोत हरला म्हणून त्यानं बायकोचा पाठीचा कणाच मोडला

वडोदरा, गुजरात । लॉकडाउनच्या काळात महिलांवरील हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरून पतीकडून आपल्या पत्नीला मारहाण केल्याच्या घटनेत वाढ होत आहे. गुजरातमधील वडोदरा येथे अशीच एक घटना घडली आहे. लॉकडाउनच्या काळात मनोरंजन व्हावे या उद्देशाने ऑनलाइन लु़डो खेळ खेळतांना   वारंवार हरल्याने नवऱ्यानं बायकोसोबत भांडणाला सुरूवात केली. हे भांडण इतकं वाढलं की नवऱ्यानं बायकोला … Read more