लॉकडाउन मध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती घसरल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशांतर्गत बाजारात सलग तिसर्‍या दिवशी सोने खरेदी करणे स्वस्त झाले आहे. मे महिन्यात सोने विक्रमीवर पातळी ४७,९८० रुपयांपर्यंत पोहोचल्यानंतर आता स्थानिक बाजारात सोन्याची घसरण ४६,७९९ रुपये झाली आहे. यापूर्वी मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा म्हणजेच गोल्ड ९९९ ची किंमत शुक्रवारपेक्षा ३०१ रुपयांनी स्वस्त झाली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट (ibjarates.com) … Read more

आता भारत अमेरिकेत तयार करेल नवीन गुहा ! जिथे साठवले जाईल कोट्यवधी टन तेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतीचा फायदा घेण्यासाठी भारत आता अमेरिकेत कच्चे तेल साठवण्याच्या पर्यायावर विचार करीत आहे. भारतात सध्या सर्व लोकल स्टोरेज पूर्णपणे परवडण्यायोग्य नाही आहे. तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी सीएनबीसी टीव्ही १८ वाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियानेही अशीच पावले उचलल्याची माहिती त्यांनी दिली होती. … Read more

पुण्यातील खवय्यांसाठी खुशखबर! वैशाली हॉटेल झाले सुरु

पुणे । कोरोनाचे संकट त्यात संचारबंदी या दोन्ही परस्परावलंबी गोष्टींमुळे पुण्यातील खवय्यांना स्वतःच्या जिभेवर खूपच ताबा ठेवावा लागला आहे. बऱ्यचदा घरी कितीही चमचमीत खाल्ले तरी काही ठराविक ठिकाणची चव त्याला येत नाही. आणि तसा फील सुद्धा नाही. असेच एक ठिकाण म्हणजे फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरचे वैशाली हॉटेल होय. कित्येक पुणेकरांची सुरुवात या हॉटेलमधील जिन्नस खाऊन होत असते. … Read more

केंद्रानं लागू केलेला लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरला; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली । केवळ २१ दिवसांत करोना विषाणूचा पराभव करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, देशातील लॉकडाउनला ६० दिवस झाले असतानाही कोरोना विषाणूचा संसर्ग जलदगतीने वाढतच आहे. देशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील लॉकडाउनचा उद्देशच असफल झाल्याचे ते … Read more

‘हा’ अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी? राज ठाकरेंचा राज्यपालांना पत्रातून खणखणीत सवाल

मुंबई । राज्यातील महत्त्वाचे नेते राज्यपालांच्या भेटीगाठी घेत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिलं आहे. मात्र, विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास राज्यपाल आग्रही असून ‘विद्यार्थ्यांच्या … Read more

श्रीलंकेच्या ‘या’ क्रिकेटपटूला ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली झाली अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेच्या पोलिसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर शेहान मदुशनकाला हेरॉइन हा मादक पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना मदुशनकाने हॅटट्रिक केली होती. दंडाधिकाऱ्यांनी या २५ वर्षीय खेळाडूला दोन आठवड्यांसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की,’रविवारी त्याला पनाला शहरातून ताब्यात घेण्यात … Read more

चीनने दिली ऑस्ट्रेलियाला धमकी; अमेरिकेला साथ दिली तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या राष्ट्रीय माध्यमांनी ऑस्ट्रेलियाला धमकी दिली आहे की,’ जर त्यांनी अमेरिकेला व्यापार युद्धात साथ दिली तर त्यांच्यासाठी ते खूप वेदनादायक ठरेल. ऑस्ट्रेलियाने अमेरिकेला पाठिंबा दिल्यास त्यांना बरेच नुकसान सोसावे लागेल, अशी धमकीवजा समज चीनने दिला आहे. अमेरिकेने शुक्रवारी जाहीर केले की,’ ते ३३ चिनी कंपन्यांवर बंदी घालणार आहे. यानंतर चिनी राष्ट्रीय … Read more

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारांवर गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | जमावबंदीचे आदेश लागू असताना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येत नमाज पठण केल्याप्रकरणी विधानपरिषदेचे सदस्य असणारे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यावर आज पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुका आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास जिल्हाधिकारी यांनी मज्जाव केलेला आहे. दरम्यान आज … Read more

राम मंदिरासाठी लॉकडाऊनमध्येही दानाचा प्रचंड ओघ सुरुच; जमा झाली ‘इतक्या’ कोटींची देणगी

अयोध्या । देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर सील करण्यात आल्या आहेत. सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे अद्याप बंद आहेत. परंतु या लॉकडाऊन दरम्यानही राम मंदिर बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात मोठी देणगी जमा झाली आहे. राम मंदिर बांधकामासाठी … Read more

पियुषजी, राज्यसभेत तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना टोला

मुंबई । स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाता यावं म्हणून सुरु झालेल्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरुन रेल्वेमंत्री आणि राज्य सरकारमध्ये कालपासून ट्विटर वॉर सुरु आहे. या शाब्दिक लढाईत आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर ट्विटरवर निशाणा साधला आहे. ‘पियुषजी, राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका’ असा चिमटा राऊत यांनी पियुष गोयल … Read more