55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनो घरीच थांबा! मुंबई पोलीस आयुक्तांचे निर्देश

मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी रात्रंदिवस ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या ३ दिवसात मुंबई पोलीस दलातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वयस्क पोलिसांना कोरोनाचा धोका लक्षात घेत पोलीस आयुक्तांनी तातडीने पावलं उचलत … Read more

१० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल – खासदार सुप्रिया सुळे

मुंबई । लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. लॉकडाउनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाऊन कधी पर्यंत चालणार याबाबत अनिश्चतता असताना विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत हवालदिल झाले आहे. दरम्यान, येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र … Read more

मोदीजी पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत- शिवसेना

मुंबई । मोदी यांनी पवारांना आपले गुरू म्हणून घोषित केलेच आहे व पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत हे दिसून आले आहे. सत्तेवर असणे वेगळे व राज्य चालविण्याचा अनुभव असणे वेगळे. त्यामुळे पवारांचा अनुभव याक्षणी महत्त्वाचा असून त्यांनी महाराष्ट्राबरोबरच इतर सर्वच राज्यांना केंद्राने मदत करावी असे सुचवले आहे. कोरोनामुळे वाढलेला खर्च आणि लॉकडाउनमुळे … Read more

लॉकडाऊन हळूहळू शिथिल झालंच पाहिजे – सुप्रिया सुळे

मुंबई । कॅफेमध्ये जाण्यासाठी किंवा मौजमजेसाठी नव्हे तर देश आणि राज्याला उभं करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी लॉकडाऊन शिथिल केलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधताना व्यक्त केलं. यावेळी राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य करतानाच नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणायची आहे. त्यामुळे अनलॉकिंग हळूहळू … Read more

RCB चे माइक हेसन परतले स्वगृही,पंतप्रधान मोदींचे मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशामध्ये ३ मे पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे आईपीएल२०२० अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि सध्याचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट डायरेक्टर माईक हेसन हे १ महिन्यापेक्षा जास्त काळ भारतातच अडकले होते पण आता माईक सकुशल आपल्या घरी परतला आहे. मंगळवारी आपल्या अधिकृत ट्विटर … Read more

लाॅकडाउननंतर विमानप्रवास करण्यासाठी ‘हे’ सर्टिफिकेट आवश्यक! अन्यथा एअरपोर्टवर नो एन्ट्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात सुरु असलेले लॉकडाउन संपल्यानंतर जेव्हा विमानसेवा सुरू होईल, तेव्हा हवाई प्रवासासाठी आपल्याला मास्क, हातमोजे आणि डिस्पोजेबल कॅप्स व्यतिरिक्त डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांचीदेखील आवश्यकता असेल. डॉक्टर, नोकरशहा आणि विमानतळ व विमान कंपन्यांचे अधिकारी यांचा समावेश असलेली टेक्निकल कमिटी लवकरच परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांवर चर्चा करतील. सरकारने यासाठी एक टेक्निकल कमिटी … Read more

सावधान! जून, जुलै महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणार; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली शक्यता

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णांची संख्या २८ हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवून ३ मे केला आहे. मात्र आता ३ मे नंतर काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य … Read more

पाकिस्तानमध्ये रमजानच्या पहिल्या दिवशीच लोकांच्या बेजबाबदार वागणुकीने सरकारच्या चिंतेत भर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रमजान महिन्यातील कोरोनाव्हायरसच्या साथीमध्ये लोकांच्या वृत्तीमुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या कपाळावर चिंता पसरली आहे. इम्रान सरकारने अनेक मार्गांनी लॉकडाऊन शिथिल केले आणि तरीही इतर लोकांनी नियमांचे उल्लंघन करणे थांबवले नाही,याचा परिणाम असा झाला की, देशात रमजान महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी मशिदी आणि रस्त्यावर लोकांची गर्दी झाली आणि सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा उडाला. हे लक्षात … Read more

तब्लिगी जमातीतील २०० कोरोनामुक्तांचा प्लाझ्मा उपचारासाठी पुढाकार

१०८० तब्लिगिंपैकी ८७० पेशंट कोरोनामुक्त झाले आहेत. यातील २०० पेशंटनी बाकी कोरोनाग्रस्तांसाठी आवश्यक असणाऱ्या अँटीबॉडीज देण्याचा निर्धार केल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजलं आहे.

रमजानमध्ये मशिदीत नमाज अदा केल्यानंतर मौलवीला झाली कोविड -१९ ची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण-पश्चिम बांगलादेशातील स्थानिक मशिदीत नमाज पठण करणाऱ्या मौलवीला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. बीडियूझेन २४ च्या वृत्तानुसार, मौलवी यांनी मगुरा जिल्ह्यातील आडंगा गावात मशिदीत शनिवारी रमजानच्या नमाजचे नेतृत्व केले आणि एका दिवसानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. बातमीनुसार, अधिकारी नमाजमध्ये सामील झालेल्या २०-२५ लोकांची यादी … Read more