जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : मकरसंक्रांती सणामुळे माण तालुक्यातील धार्मिक स्थळांवर संचारबंदी लागू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाला लक्षात घेता मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने नविन आदेश दिले आहेत. मकरसंक्रांती निमित्त माण तालुक्यात सुमारे 1 ते दीड लाख महिला या माण तालुक्यातील विविध धार्मिक ठिकाणी देवदर्शनासाठी येत असतात. त्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून माण तालुक्यातील स्थानिक प्रशासनाला … Read more

भयानक : सातारा जिल्ह्यात तरूणाने वृध्द महिलेसह झोपडी पेटवली

दहिवडी | माण तालुक्यातील जाशी येथे पैशासाठी वृध्देला तिच्या झोपडीसह जाळून मारल्याची घटना उघडकीस आलेली आहे. या परिसरात अजूबाजूला कोणीच राहत नसल्याने हा प्रकार उशिरा समजला आहे. घटनेनंतर दोन ते तीन दिवसानंतर भेटण्यास आलेल्या भाच्यास झोपडीसह वृध्द महिला जळून खाक झाल्याचे दिसून आले. तेव्हा त्याने दहिवडी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून एका युवकास अटक करण्यात … Read more

मायलेकराचा मृत्यू : शिंगणापूर घाटात 400 फूट खोल दरीत कार कोसळली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात 400 फुट खोल दरीत कार कोसळली. या अपघातात थदाळे (ता. माण) येथील मायलेकरांचा मृत्यू झाला. गजानन सर्जेराव वावरे (वय- 58) व हिराबाई सर्जेराव वावरे (वय- 75) अशी मृत आई व मुलांचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सध्या नाशिक येथे महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस असलेले गजानन सर्जेराव … Read more

लष्करप्रमुख मनोज नरवणे माण तालुक्यातील नसून मूळचे कुठले ? जाणून घ्या

सातारा | देशाचे पहिले संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नवीन संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) म्हणून सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांची 11 डिसेंबर 2021 रोजी वर्णी लागली आहे. सोशल मिडियावर मनोज नरवणे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील नरवणे येथील असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. वास्तविक लष्करप्रमुख नरवणे हे सातारा जिल्ह्यातील … Read more

माण तहसीलदार कार्यालयात मध्यस्थाचा बाजार 

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस दलांलाची टोळीच दहिवडी शहरातील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत असल्याचे दिसून येते. आधिकाऱ्यांकडे गेल्यास कामच होत नाही, तर दलांलाचा माध्यामातून काही तासातच  काम होवून जाते. यामुळे अनेजण दलालांचा आधार घेत आहे. तर दुसरीकडे काही आधिकारी व कर्मचाऱ्यांनी एजंट नेमल्याची दबक्या आवाजातच चर्चा आहे. घरकूल योजना, शिधापत्रिका, विधवा पेशन योजना, अंपग वेतन, … Read more

आठ दिवसात बिले जमा न झाल्यास शेतकरी संघटना बोंबाबोंब आंदोलन करणार

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस माण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारी बिले गेली दोन वर्षापासून अडकलेली आहेत. तेव्हा प्रशासनाने आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा करावीत. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने शहराध्यक्ष जोतिराम जाधव, शेतकरी संघटना अध्यक्ष शंकरराव जाधव यांनी पंचायत समिती माण या ठिकाणी विस्तार अधिकारी व सभापती यांना निवेदन दिले. या निवेदनात असे म्हटले आहे की, … Read more

जाधववाडी येथे शेतकरी मेळावा व शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन

दहिवडी प्रतिनिधी आकाश दडस माण तालुक्यातील जाधववाडी येथे शेतकरी मेळावा व शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन झाले या उद्घाटन कार्यक्रमास उद्घाटक म्हणून शेतकरी संघटनेचे क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नाना नांदखीले उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनेचे पांडुरंग रायते पुणे, जिल्हा अध्यक्ष हनुमंत वीर, पश्चिम महाराष्ट्र युवा युवा आघाडी अध्यक्ष शेतकरी संघटना विकासराव जाधव, अध्यक्ष सातारा … Read more

वैशाली खाडे जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2021 सौ. वैशाली मोहन खाडे उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा ( दहिवडी) यांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम 6 सप्टेंबर 2021 रोजी पार पडला आदर्श शिक्षिका सौ. वैशाली खाडे यांना सन्मानित … Read more

धक्कादायक : माण तालुक्यात पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचेही निधन

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस माण तालुक्यातील वरकुटे- मलवडी येथे पत्नीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी (रक्षाविसर्जन) पतीचे निधन झाले आहे. पती- पत्नीच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पत्नी सुभद्रा पडळकर (वय- 85) हिच्या निधनानंतर पती शंकर पडळकर (वय-90) यांचेही निधन झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी वरकुटे – मलवडी ता.माण येथील श्री शंकर पडळकर (वय- … Read more

लाचलुचपतची कारवाई : माण तालुक्यातील तलाठी 2 हजाराची लाच घेताना जाळ्यात

Lach

दहिवडी | माण तालुक्यातील वरकुटे-म्हसवड येथील तलाठी दादासो अनिल नरळे (वय- 37, रा. पाणवन ता. माण) या तलाठ्याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. तक्रारदारांकडून वारस नोंदीसाठी 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी 2 हजार स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार 21 वर्षीय युवक आहे. एसीबीच्या या कारवाईनंतर माण … Read more