‘घरात आलबेल आहे सांगण्याची पाळी का येते?’, सुरेश धस यांचे शरद पवार यांच्यावर शरसंधान

धस हे ‘महायुती’चे उमेदवार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत बीड मतदार संघातील रायमोहा येथे आयोजित सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे, जयदत्त क्षिरसागर रमेश पोकळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

‘पंकजा मुंडे माझ्यावर नाराज नाहीत’ – आमदार मोनिका राजळे

शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ‘भाजपा’ने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा बराच मोठा वर्ग या मतदारसंघात आहेत. त्यातच गेल्या काही दिवसापासून आमदार राजळे यांच्यावर पंकजा नाराज असल्याची चर्चा चालू होती. मात्र, आज प्रचाराच्या शुभारंभावेळी पंकजा आपल्यावर नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर नागपूरच्या आ. मिलिंद मानेंना नागरिकांनी घेतले फैलावर

आज प्रचारादरम्यान मानेंना जनतेच्या विरोधाचा चांगलाच सामना करावा लागला. उत्तर नागपूर परिसरात भाजपाचे उमेदवार असलेले माने प्रचारासाठी गेले असता लोक त्यांच्यावर चांगलेच भडकले. यावेळी परिसरातील महिलांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्यावर पाण्याच्या प्रश्नाबाबत जाब विचारत प्रश्नांचा मारा करत ”मागील पाच वर्षे कोठे होता?” असा सवाल करण्यात आला. यामुळे माने चांगलेच भांबावल्याचे पहायला मिळाले. यावेळी परिसरातील नागरिकांना कार्यकर्त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचे दिसून आले.

मराठ्यांचं पाठबळ राष्ट्रवादीला तारणार का ? सकल मराठा समाजाचा राष्ट्रवादीला पाठींबा

राज्य सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने आज बहुजन विचाराच्या राष्ट्रवादी काॅग्रेसला विधानसभा निवडणूकीसाठी पाठींबा जाहीर केला आहे. सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आज पंढरपुरमध्ये ही घोषणा केली.

भाजपात असल्याचा महाडिकांना पडला विसर; राष्ट्रवादीला मतदान करा म्हणून केले आवाहन

आपले चुलत बंधू अमोल महाडीक यांच्या प्रचारार्थ गोकुळ शिरगाव येथे घेतलेल्या सभेदरम्यान मतदान करण्याचा आवाहन करताना ‘धनंजय महाडिक यांनी चक्क घड्याळ निशाणीसमोरील बटन दाबण्याचे’ उपस्थितांना आवाहन केले. मात्र आपली चूक झाली हे लक्षात येताच त्यांनी ‘कमळ चिन्हा’चा उल्लेख करताच सभास्थळी एकच मोठा हशा पिकला. दरम्यान शरीराने भाजपा मध्ये गेलेल्या धनंजय महाडिकांच्या हृदयात मात्र ते म्हणतात त्या प्रमाणे शरद पवारच असल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

तर तेजस ठाकरे होणार ‘युवासेना प्रमुख’ ?

युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार असतानाच आता त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे यांच्या नावाची ही जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेचे कारण म्हणजे तेजस ठाकरे यांचा राजकीय व्यासपिठांवर वाढलेला वावर. बुधवारी तेजस हे संगमनेरमधील शिवसेनेच्या सभेमध्ये व्यासपीठावर दिसून आले. यानंतर तेजस यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

दगडाला पाझर फुटेल पण अजित पवारांचं रडणं ही काय भानगड? उद्धव ठाकरेंची शेलक्या शब्दांत टीका

अहमदनगर प्रतिनिधी । ‘दगडाला पाझर फुटतो हे ऐकलं होतं पण अजित पवारांच्या डोळ्यांत अश्रू येतात हे पहिल्यांदाच समजलं’ अशी शेलकी टीका उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केली. शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे अहमदनगर येथे आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली. १५ वर्ष सत्तेत असताना … Read more

लिंबूवाले अंधश्रद्धाळू सरकार एक्सा नागरी कायदा काय आणणार- असदुद्दिन ओवेसी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ‘ एक्सा सीव्हील कोड’ आणायचं म्हणत आहेत. एकीकडे फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानासमोर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लिंबू ठेवत असतील तर हे सरकार एक्सा सिव्हील कोड कसं आणणार असा सवाल एमआयएम पक्षप्रमुख खासदार असऊद्दीन ओवेसी यांनी केला आहे. शिवसेनेच्या बोटचेप्या भूमिकेवर त्यांनी सडकून टीका केली.

‘हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही’; इम्तीयाज जलीलांची सत्ताधाऱ्यांना तंबी

आजचे देशातील सत्ताधारी मुस्लिमांना दहशतवाद्यांच्या नजरेतून बघतात. सिमी काय, आयसिस काय, मुजाहिद्दीन काय, दहशतवादी म्हटलं की आम्हालाच टार्गेट करतात. पण एक भारतीय मुस्लीम म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो, हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही. हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचाही आहे असा घणाघाती पवित्रा एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांनी आज परभणीत घेतला.

‘पेडन्यूज प्रकरणात बारकाईने लक्ष ठेवा’- सूचना खर्च निरीक्षक आर. नटेश

कोल्हापूर प्रतिनिधी । ‘विधानसभा निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांकडून पेडन्यूज होण्याची शक्यता असल्याने पेडन्यूज प्रकरणात बारकाईने लक्ष ठेवा आणि भारत निवडणूक आयोगाच्या याबाबत असलेल्या सूचनांची काटेकोर अमंलबजवणी करा,’ अशा सूचना खर्च निरीक्षक आर. नटेश यांनी दिल्या. खर्च निरीक्षक श्री. नटेश यांनी जिल्हास्तरीय माध्यम कक्षास भेट देऊन कक्षाकडील कामकाजाची माहिती घेतली. प्रसार माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा … Read more