तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल : प्रकाश आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करत आहे. पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे देखील बोलले जाते आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांना जर मुख्यमंत्री करायचे असेल तर शिवसेनेने हा मुद्दा रेटून धरला पाहिजे अन्यथा त्यांचा राहुल गांधी होण्यास उशीर लागणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. … Read more

राष्ट्रवादीच्या पूर्व प्रदेशाध्यक्षाचं ठरलं ! १३ सप्टेंबरला करणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह १३ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पैकी एक आमदार शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. युतीच्या इतिहासात प्रथमच शिवसेना होणार लहान भाऊ ; जागा वाटपाच्या … Read more

युतीच्या इतिहासात प्रथमच शिवसेना होणार लहान भाऊ ; जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यावर होणार शिक्का मोर्तब

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप यांची युती १९८९ सालापासून आज तागायत आहे. २०१४ च्या निवडणुकीचा अपवाद सोडला तर शिवसेना विधानसभेच्या मागील ५ निवडणुकासोबत लढली आहे. तर सेना भाजपची युती ३० वर्षांपासून अखंडित आहे. मात्र युतीच्या आजवरच्या इतिहासात शिवसेना कधीच भाजपपेक्षा कमी जागा घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली नाही. परंतु आगामी निवडणुकीला भाजपचा दिग्विजय पाहून शिवसेना नरमली … Read more

काँग्रेस सोबत निवडणूक लढवायची की नाही या बाबत प्रकाश आंबेडकरांनी केले अंतिम विधान

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धूळ चारत मोठी ताकद म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू होती. मात्र, आज त्यावर पूर्णविराम लागला. आंबेडकर … Read more

युतीच्या फॉर्म्युल्यावर गिरीश महाजन म्हणतात

नाशिक प्रतिनिधी भाजपा पक्षाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तोच युतीचा फॉर्म्युला असेल, त्याबाबत मध्ये कोणीही काही मत मांडण्याची गरज नाही, असा टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा सुरू झाली असली तरी जागावाटपासाठी ५०:५० चा फॉर्म्युला अद्याप ठरलेला … Read more

सोपलांना बाळासाहेब ठाकरेंनी धूळ चरायला सांगितली होती ती आम्ही चारणार ; नाराज शिवसेना नेत्यांचा पक्षासोबत असहकार

बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार असणाऱ्या दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावर नाराज असणाऱ्या भाऊसाहेब आंधळकर यांनी सोपल यांच्या प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलीप सोपल यांचे काम करणार नाही असे म्हणत त्यांचा आम्ही पराभव घडवून आणणार असे म्हणले आहे. “मी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन राजकरणात आलो. शिवसेनेचा भगवा खांदयावर … Read more

म्हणून सरकारने गडकोट विक्रीला काढले : प्रकाश आंबेडकर

नागपूर प्रतिनिधी |  राज्य सरकारच्या गडकोट भाड्याने देण्याच्या निर्णयाचा विरोधक आणि सोशल मिडीयाने देखील निषेद केला आहे. त्याच मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी देखील तोंडसुख घेतले आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका करताना सरकारला दारुड्याची उपमा दिली आहे. ‘या सरकारची संपूर्ण तिजोरी खाली झाली आहे. एखाद्या दारुड्याप्रमाणे यांची अवस्था झाली आहे. म्हणून आता … Read more

एमआयएमच्या युती तोडण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर म्हणतात

नागपूर प्रतिनिधी |  वंचित बहुजन आघाडीत फूट पडली असून एमआयएम वंचित मधून बाहेर पडली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढून या संदर्भात घोषणा केली आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम प्रमुख असुद्दीन ओवेसी यांची मी हैद्राबाद येथे जाऊन भेट घेतली आहे. तसेच हैद्राबाद वरून काही प्रतिनिधी येऊन मला … Read more

कर्जत जामखेड : हा व्यक्ती अपक्ष उभारल्यास रोहित पवार निवडणूक जिंकण्याची शक्यता

अहमदनगर प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत जामखेड मधून उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे तगडे आव्हान असणार आहे. मात्र या दोघांच्या विरोधात राम शिंदे यांचे निकटवर्तीय नामदेव राऊत अपक्ष उभा राहिल्यास रोहित पवार यांचा मार्ग सुखकर होऊ शकतो. नामदेव राऊत हे राम शिंदे यांचे … Read more

अचलपूरमध्ये विधानसभेसाठी बच्चू कडू विरुद्ध बाकी सगळे

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई 14 तालुक्यांच्या अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट मोर्शी, धामणगाव यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडी समर्थक उमेदवार नवनीत राणा यांनी विजय मिळवला. त्यामुळे एकाच घरात आमदार आणि खासदार असं चित्र अमरावतीत आहे. या दोघांची ताकद येत्या विधानसभा निवडणुकीत कुठले … Read more