Saturday, March 25, 2023

एमआयएमच्या युती तोडण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर म्हणतात

- Advertisement -

नागपूर प्रतिनिधी |  वंचित बहुजन आघाडीत फूट पडली असून एमआयएम वंचित मधून बाहेर पडली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढून या संदर्भात घोषणा केली आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

एमआयएम प्रमुख असुद्दीन ओवेसी यांची मी हैद्राबाद येथे जाऊन भेट घेतली आहे. तसेच हैद्राबाद वरून काही प्रतिनिधी येऊन मला भेटून गेले आहेत. त्यामुळे आता असुद्दीन ओवेसी यासंदर्भात कोणती घोषणा करत नाहीत तोपर्यंत आमची आणि एमआयएमची युती आहे असे समजावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

- Advertisement -

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जागा वाटपावरून मतभेद झाले आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याशी कसलीही चर्चा नकरता जलील यांनी वंचित सोबत असणारी युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एमआयएम राज्यात ९८ जागांची मागणी करत आहे. तर तेवढ्या जागा सोडण्यास प्रकाश आंबेडकर तयार नाहीत. त्यामुळे जलील आणि आंबेडकर त्यांच्यात वाद निर्माण झाले आहेत.