आता पेट्रोल पंपावर तेल चोरी करणे पंप चालकांना पडेल भारी ! ग्राहकांच्या तक्रारीवर होईल परवाना रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पेट्रोल पंपांवर चिप लावून तेल चोरी करणे आता ऑपरेटर्सवर भारी पडणार आहे. देशात दररोज पेट्रोल पंपांवर मशीनमध्ये चिप्स टाकून पेट्रोल आणि डिझेलच्या होणाऱ्या चोरीच्या घटना लक्षात घेता मोदी सरकारने कडक पावले उचलली आहेत. 20 जुलै रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू झाल्यानंतर पेट्रोल पंप ऑपरेटर्सवर आपली पकड घट्ट करण्यास … Read more

भारताकडून चीनला आणखी एक फटका; केंद्र सरकारने केला ‘या’ कायद्यात बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीन यांच्या संबंधावर अनेक परिणाम झाले आहेत. त्या झालेल्या चकमकीत भारताच जे २० जवान शहीद झाले होते. तर चीनचे ४३ जवान मारले गेले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सीमेवर जाऊन भारतीय जवानांची भेट घेतली. भारताने चीनची सर्व बाजूनी कोंडी करत चीनच्या ५९ अँप वर … Read more

”मी इथेच बसलोय, सरकार पाडून तर दाखवा”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवरुन शेअर केला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवा, असे जाहीर आव्हान केलं आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी म्हटले आहे की, मी इथेच बसलोय. माझी मुलाखत सुरु … Read more

EESL सुरू करणार ग्रामीण उजाला हा कार्यक्रम, १० रुपयांत देणार LED बल्ब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लि (ईईएसएल) आता लवकरच वीज बिल कमी करण्याच्या माध्यमातून गावांमध्ये ऊर्जा दक्षता नेण्यासाठी आणि लोकांची बचत वाढविण्याच्या उद्देशाने ग्रामीण उजाला हा नवीन कार्यक्रम सुरू करणार आहे. याबाबत माहिती देताना ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार म्हणाले की, या अंतर्गत गावांमध्ये प्रति कुटूंब दहा रुपये दराने 3 ते … Read more

पालकांनो तुम्हीच सांगा , शाळा कधी सुरु करायच्या?

दिल्ली । देशभरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये लॉक डाउन ची घोषणा पुन्हा एकदा केली आहे. काही राज्यांमध्ये शाळा या ऑनलाईन मोड वर सुरु केलेल्या आहेत. तर काही राज्यांनी अद्याप शाळा सुरु केलेल्या नाहीत. त्यातच शाळा केव्हा सुरु होणार असा प्रश्न अनेक पालकांना पडला … Read more

१ जुलैपासून आशा स्वयंसेविकांना मिळणार वाढीव मानधनाचा लाभ, शासन निर्णय जाहीर

मुंबई । राज्यातील आशा स्वयंसेविका (Accredited Social Health Activist (ASHA) आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाकडून काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात शुक्रवारी आरोग्य विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. हा वाढीव मोबदला १ जुलै २०२० पासून मिळणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश … Read more

पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजना: जर तुम्हालाही मिळाले नसतील 6000 रुपये तर करा ‘या’ हेल्पलाईनवर कॉल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 18 महिन्यांत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सुमारे 10 कोटी 9 लाख शेतकरी कुटुंबियांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आलेले आहेत. या योजनेंतर्गत अजून 4 कोटी 40 लाख लोकांना मदत पाठवावी लागेल. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ज्या शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या बँक खात्यातील … Read more

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! आता 31 जुलै पर्यंत नोंदणी करणाऱ्यांनाच मिळेल सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण शेतकरी असल्यास आपल्यासाठी ही बातमी महत्त्वपूर्ण आहे. खरिपाच्या पिकांना दुष्काळ, पूर, भूस्खलन, अवकाळी पाऊस, गारपीट, कीटकांचे हल्ले, नैसर्गिक अग्नि आणि चक्रीवादळ यांसारख्या जोखमीपासून संरक्षण द्यायचे असेल तर पंतप्रधान पीक विमा योजना घ्या. आता पीक विम्यासाठीचे रजिस्ट्रेशन मोफत केले आहे. फक्त प्रीमियम जमा करावा लागेल. धान्य व तेलबिया या पिकासाठी केवळ … Read more

आता तुमच्या गाडीमध्ये बसविली जाईल हिरव्या रंगाची नंबर प्लेट , पिवळ्या रंगात लिहावा लागेल Number, सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता इलेक्ट्रिक कारसाठी विशेष सुविधा देण्याची तयारी केली जात आहे. त्यांना पार्किंग आणि टोलमध्ये विशेष सवलत दिली जाऊ शकते. या वाहनांच्या वेगळ्या ओळखीसाठी त्यांच्यावर ग्रीन नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच वेळी, आता या वाहनांच्या नंबर प्लेटच्या रंगाविषयी स्पष्टीकरण देताना, सरकारने सांगितले की बॅटरीवर चालणाऱ्या या वाहनांवर ग्रीन नंबर … Read more

दूध दरासाठी सरकारला दुधाची आंघोळ : रयत क्रांती संघटना करणार 1 ऑगस्टला आंदोलन

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देत असल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतक-यांना १६ ते २० रुपये एवढाच दर मिळतो. सरकारने गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर १० रुपये थेट अनुदान द्यावे. याशिवाय दूध पावडर निर्यातीला चालना द्यावी, या मागणीसाठी एक ऑगस्टला राज्य सरकारला दुधाची आंघोळ घालून आंदोलन करणार आहे,’ … Read more