कौतुकास्पद !!! चहा विकणाऱ्या मुलास पोलीस कर्मचाऱ्याने केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या महामारीत काळात देशातील पोलीस प्रशासनाने महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात राज्यातील पोलीस शिपायांनी महत्वाची कामगिरी बजावली होती. त्याच वर्दीतल्या लोकांकडून अनेकांना मदतीचा हात ही मिळाला होता. पोलीस दलाने या काळात अत्युच्य असे धैर्याचे काम केले आहे.पोलीस वर्दीतली माणुसकी अनेक वेळा पाहायला मिळाली आहे. अनेक वेळेला कोण्या आजीला दवाखान्यात घेऊन जाणारा, आजोबाला आपला … Read more

सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीने केली CBI चौकशीची मागणी; गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल सीबीआय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चाहते आणि अभिनेते शेखर सुमन तर सतत या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत, नुकतेच राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांनीही … Read more

आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतोय बेबी पेंग्विन ? काय आहे प्रकरण?

मुंबई| ठाकरे सरकारची तुलना मुघल राजाशी केल्याने एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीत ठक्कर या मुंबईतील एका यूजर ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. १ जुलै रोजी करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा नव्या काळातील औरंगजेब असा केला असून … Read more

गेल्या ७२ तासांत ४ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू; राज्यातील पोलिसांच्या मृत्यूचा आकडा ८१ वर

मुंबई । गेल्या ७२ तासांत महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील पोलिसांच्या मृत्यूचा आकडा ८१ झाला असून एकट्या मुंबईतच (mumbai) आतापर्यंत ४८ पोलीस दगावले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पोलीस दलालाही कोरोनाचा विळखा बसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या ७२ तासांत मुंबई, नवी मुंबई आणि … Read more

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण: मुंबई पोलिसांनी घेतली फॉरेन्सिक टीमची भेट, तपासाअंती ‘हे’ उघडकीस

मुंबई | सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिस आता हळूहळू आपल्या अंतिम अहवालाकडे वाटचाल करत आहेत. आमच्याकडे असलेल्या विशेष माहितीनुसार शनिवारी या प्रकरणाशी संबंधित उच्च अधिका्यांनी फॉरेन्सिक टीमशी संबंधित पाच अधिकाऱ्याची स्वतंत्रपणे भेट घेतली.. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दहा ते पंधरा दिवसांत फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल मुंबई पोलिसांकडे सादर केला जाईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या खुनाचा २४ तासांच्या आत छडा; पाच जणांना अटक

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कुपवाड एमआयडीसी मध्ये काल शुक्रवारी भर दुपारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या खुनाचा उलगडा २४ तासाच्या आत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलं आहे. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून निलेश गडदे याने त्यांच्या मित्रांसमावेश थरारक पाठलाग करून निर्घृणपणे दत्तात्रय पाटोळे यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या … Read more

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण: सलमान, करण जोहरसह ‘या’ ८ सेलिब्रिटींविरोधात कोर्टाचा मोठा निर्णय!

मुंबई | सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. पण त्यादरम्यान सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवसानंतर, बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये 8 सेलिब्रिटींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वकील सुधीरकुमार ओझा यांची ही याचिका होती. महत्त्वपूर्ण म्हणजे ओझाने आपल्या तक्रारीत सलमान खान, करण जोहर, एकता कपूर, आदित्य चोप्रा आणि संजय लीला भन्साळी यांच्यावर सुशांतच्या आत्महत्येचा आरोप केला. मुजफ्फरपूरचे मुख्य … Read more

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील याचिका फेटाळली; न्यायालयाने सांगितली ‘ही’ गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेली याचिका सीजेएम कोर्टाने फेटाळून लावली आहे. हा विषय आपल्या कार्यकक्षाबाहेरील असल्याचे सांगून कोर्टाने तो मान्य करण्यास नकार दिला. या प्रकरणात वकील सुधीर ओझा यांनी चित्रपटाचे अभिनेते सलमान खान, करण जोहर, एकता कपूर यांच्यासह 12 फिल्मी हस्तींविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्याअंतर्गत या प्रकरणात … Read more

बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर! राज्य पोलीस दलात होणार जम्बो भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात राज्यातील पोलीस दलात १० हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी … Read more

महाविकास आघाडी सरकारची मोठी घोषणा; राज्यात १० हजार पोलिसांची भरती करणार

मुंबई । राज्यातील पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी पोलीस शिपाई संवर्गात १० हजार जागा भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात शहरी आणि ग्रामीण तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. झी २४ तास वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. याशिवाय नागपूरमधील काटोल … Read more