महाराष्ट्राला २ मुख्यमंत्री दिलेले नाईक घराणे शिवसेनेत जाणार

यवतमाळ प्रतिनिधी| मागील काही दिवसापासून पक्षांतरांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार माजी मंत्री मनोहर नाईक हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते आहे. जागा वाटपात पुसद विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने नाईक कुटुंब शिवसेनेत जाणार आहेत. यासंदर्भात मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक यांनी खुलासा केला आहे. येत्या काही दिवसात आम्ही राष्ट्रवादी सोडणार … Read more

दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?

बार्शी प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे बार्शी मतदारसंघाचे आमदार दिलीप सोपल यांनी काल राष्ट्रवादीच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली. देवदर्शनाला बाहेरगावी गेलो असल्याचे कारण सांगत दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला जाणे टाळले. अशा अवस्थेत दिलीप सोपल भाजपच्या संपर्कात असल्याचे देखील वृत्त सूत्रांनी दिले आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत यांच्या चिंता वाढल्या आहेत. काही करून निवडणूक जिंकायचीच असा … Read more

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ; भाजपमध्ये करणार प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चित्रा वाघदेखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. येत्या ३० तारखेला चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.शुक्रवारी रात्री त्यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलेच भाजपवासी करण्याकडे भाजपच्या नेत्यांनी चांगलीच रणनीती … Read more

बारामतीकरांचा विश्वासघात ; इंदापूर काँग्रेसला सोडणार नाही ; हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर

इंदापूर प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे इमाने इतबारे काम करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्या वाट्याला पुन्हा विश्वासघात येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे इंदापूरची जागा पुन्हा जिंकतील त्यामुळे राष्ट्रवादी हि जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडणार नाही असा पवित्रा राष्ट्रवादीने जागा वाटपाच्या बैठकीत घेतला आहे अशी माहिती … Read more

राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले सचिन अहिर आहेत तरी कोण

मुंबई प्रतिनिधी | राजकारणात कोणी कुणाचं नसतं अशी म्हण आहे. ती खरीच आहे. कारण मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर हे आज शिवसेनेत गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. कधी काळी शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे सचिन अहिर नेमके आहेत कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे. इच्छुकांच्या मुलाखतीला अजित पवार … Read more

या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !

औरंगाबाद प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला इम्तियाज जलील यांच्याकडून पराभूत झालेले औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रकांत खैरे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला औरंगाबादमध्ये ऊत आला आहे. वैजापूरचे माजी आमदार आर.एम वाणी यांनी प्रकृतीचे कारण देत विधानसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे त्यामुळे या ठिकाणी जागा झाल्याने खैरेंना त्या जागी पुनर्वसित केले जाईल असे … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : या मतदारसंघात सहाव्यांदा जिंकण्यास भाजप सज्ज

अकोला प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपल्या असताना आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर महाराष्ट्रात असे काही मतदारसंघ आहेत ज्या मदतरसंघात मागील पाच अथवा सहा निवडणूका एकाच पक्षाची सत्ता कायम आहे ते मतदारसंघ आणि तेथील निवडणुकांची सूत्र मोठी रोचक असतात. असाच एक मतदारसंघ आहे जिथे भाजपचे कमळ १९९५ पासून आजतागायत फुलते … Read more

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय ; या सरकारी कर्मचाऱ्यांना देखील मिळणार सातव्या वेतन आयोगाचा लाभ

मुंबई प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाकाच देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. आज पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिकेच्या आणि महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनादेखील सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळेल असे जाहीर केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणारे कर्मचारी वगळता या आधी महाराष्ट्रात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानंतर … Read more

अबकी बार २२० के पार ; साथ में शिवसेना का मोडका संसार

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप एकत्रित येऊन लोकसभा निवडणूक लढले मात्र येती विधानसभा निवडणूक कशी लढायची यावर भाजप फेरविचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपची काल कार्यकारिणीची बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीला राज्यभरातून भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मीच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहे असे ठणकावून सांगितले. … Read more

आमदार संजय कदम यांना एक वर्षाचा सक्षम कारावासाची शिक्षा

दापोली प्रतिनिधी | २००५ मधील तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा आणण्याचे प्रकरण खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कदम यांना चांगलेच भोवले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खेड दिवाणी न्यायालयाने आमदार कदम यांना एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली होती. हा निर्णय अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कायम ठेवल्याने आमदारा कदमांना आज … Read more