नाईलाजाने लॉकडाऊन करण्याची वेळ आलीय; रोहित पवारांची सूचक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी प्रमाणे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या राज्यात वीकेंड लॉकडाऊन चालू असला तरी कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल टास्क फोर्स सोबत याबाबत चर्चा देखील केली. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर … Read more

कोरोना रोखायचा असेल तर लॉकडाऊन अटळ – अस्लम शेख

aslam shaikh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. कोरोना रोखायचा असेल तर लॉकडाऊन अटळ आहे. असं विधान काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे.महाराष्ट्रात संख्या जास्त असूनही व्यापारी, गरिबांचा विचार करत आहोत. त्यामुळे सगळ्यांचं एकमत घेऊन पुढची दिशा निश्चित करायची आहे असे ते म्हणाले. राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर … Read more

लॉकडाऊन च्या भीतीने मुंबईत रेल्वे स्थानकावर गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा उडाला फज्जा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात करोनाची वाढती संख्या चिंताजनक बाब बनली आहे. अशातच ठाकरे सरकारनं राज्यात ‘ब्रेक द चेन’ हे ब्रीद घेऊन वीकेंड लॉक डाऊन आणि कडक निर्बंध घातले आहेत. मात्र कडक लॉक डाऊन करण्यात येणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. याच भीतीतून देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या अनेक जणांनी आता रेल्वे स्टेशन वर आपापल्या गावी … Read more

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

mohan bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat Tests Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं असल्यानं त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं … Read more

राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन अपरिहार्य- विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाचं संकट वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन  होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. लशींचा तुटवडा निर्माण होऊनही महाराष्ट्राला पुरवठा केला जात नाही. … Read more

मुख्यमंत्री सचिवालयाकडून वीकेंड लाॅकडाऊनबाबत संपुर्ण नियमावली जाहीर; जाणुन घ्या थोडक्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करतानाचा निर्बंध आणखी कठोर केले आहेत. ज्यामुळे आता राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने राज्यात वीकेंड लॉकडाऊन सोबतच कडक निर्बंध घालून एक पाऊल पुढे टाकले आहे. गतवर्षी लॉकडाऊननंतर राज्यात मिशन बिगीन अगेनच्या माध्यमातून राज्य सरकारने हळूहळू सर्वकाही … Read more

राज्यात वीकेंड लॉकडाऊन; काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अखेर राज्यातील ठाकरे सरकारने दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत … Read more

राज्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज सुमारे 45 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असून राज्य सरकार 10 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करण्याची शक्यता आहे. यापूर्वी राज्यात काही महत्त्वाच्या ठिकाणी कडक निर्बंध लादून देखील कोरोना रुग्णसंख्या काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे सरकार आता मोठा … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला अमृत बंग यांनी सुचवला ‘झकास’ पर्याय..!! 2900 डॉक्टर एकाच वेळी रुग्णांच्या सेवेत येणार का??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य सुविधा वाढवणे आवश्यक आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच त्याबाबतची एक अडचण सांगितली ती म्हणजे डॉक्टरांची उपलब्धता. “…मी हात जोडून सांगू इच्छितो, की आरोग्य सुविधा आपण वाढवतोच, पण कृपा करून रोज मला किमान ५० डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांची महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा, … Read more

महाराष्ट्रात लॉकडाऊन की कठीण निर्बंध? मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून काल दिवसभरात तब्बल 49 हजार कोरोना रुग्ण वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईसह राज्याबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध जाहीर … Read more