राज्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज सुमारे 45 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असून राज्य सरकार 10 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करण्याची शक्यता आहे. यापूर्वी राज्यात काही महत्त्वाच्या ठिकाणी कडक निर्बंध लादून देखील कोरोना रुग्णसंख्या काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे सरकार आता मोठा निर्णय घेऊ शकते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः विस्फोट केला असून ही चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जनतेशी संवाद साधून थेट लॉकडाऊचा इशारा दिला होता.

मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरे – फडणवीसांना फोन

दरम्यान राज्यात कोरोना आटोक्यात येत नसल्याने जर लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास मनसेनं सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस याना केलं आहे. दरम्यान,राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतोय.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like