ज्यांची संस्कृती कट्टा ठेवणाऱ्यांची आहे अशांना सत्याग्रह कसा कळणार? काँग्रेसची भाजपवर टीका

माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधींबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. “महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं. अशा लोकांना भारतात महात्मा कसं काय संबोधलं जातं?” असा प्रश्न उपस्थित करत हेगडे यांनी गांधींच्या एकूण स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर टीका केली.

महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं! भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र।  भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ”महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं. अशा लोकांना भारतात महात्मा कसं काय संबोधलं जातं?” असाही प्रश्न हेगडे यांनी उपस्थित केला. एवढंच नाही तर ” देश स्वतंत्र होण्यासाठी जी स्वातंत्र्य चळवळ ती इंग्रजांच्या साथीने चालवण्यात आली होती. … Read more

वाचनाने आम्हाला काय दिलं? – भाग ६

पोटाला जेवण नसेल तरी चालेल पण डोक्याला खुराक पाहिजे. वाचनामुळे माणूस आयुष्यात प्रगती करू शकतो. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. पुस्तक हा आपला गुरू असतो कारण आपण ज्या गोष्टी वाचतो त्या आपल्याला बरेच काही शिकवतात. माणसाने आवड जपावी ती वाचनाची.

गांधीजींनी आत्महत्या कशी केली? गुजरातमधील शाळेने परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाने खळबळ

महात्मा गांधी यांनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारून गुजरातमधील एका शाळेने खळबळ उडवली असून गुजरातच्या शिक्षण विभागाने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. आणखी एका अशाच प्रश्नामुळे गुजरातच्या शिक्षण अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. गुजरात राज्यात दारुबंदी असताना दारू गाळण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. गांधीजींनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न गांधीनगरमधील सुफलम शाळा विकास संकुलातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन परीक्षेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाने शिक्षण अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे.

महात्मा गांधींची आठवण काढायला नथुराम गोडसे आज पुन्हा येतोय..!!

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलेल्या आणि नुकत्याच कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बऱ्या झालेल्या शरद पोंक्षे यांची माध्यमविश्वात पुन्हा नव्याने एंट्री होत आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ‘माझा कट्टा’ या विशेष उपक्रमात ते दर्शकांशी दिलखुलास गप्पा मारताना दिसतील.

ब्रिटनची महात्मा गांधींना अनोखी आदरांजली..

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ ब्रिटन एक नाणं काढणार आहे. ब्रिटनचे मुख्य अर्थमंत्री साजिद जाविद यांनी ही माहिती दिली आहे. मूळ पाकिस्तानी वंशाचे असलेल्या ब्रिटिश अर्थमंत्र्यांनी ब्रिटनच्या रॉयल मिंटला याबाबत आदेश दिले आहेत. महात्मा गांधींचे विचार कधीही विसरले जाऊ नयेत यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इकडे गांधी, तिकडे गांधी ; जिकडे तिकडे गांधीच गांधी

महात्मा गांधींची १५० वी जयंती जगभरात साजरी होत आहे. गांधी समजून घ्यायचे प्रयत्न आजही सुरु आहेत. गांधी नक्की कुठे कुठे आहेत हे काव्यात्मक स्वरूपात मांडण्याचा हा प्रयत्न – नामदेव अंजना

आणि गांधीजींना रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून बाहेर फेकण्यात आले..

Mahatma Gamdhi

महात्मा गांधी जयंती विशेष | मयुर डुमने ७ जून १८९३ या दिवशी दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीजींना तुम्ही काळे आहात म्हणून रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून बाहेर फेकण्यात आले होते. या अपमानामुळे गांधीजींचे जीवन बदलून गेले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची बीजे या घटनेत पेरली गेली. काय होती ही नेमकी घटना ? जाणून घेऊ या.. पोरबंदर या गांधींजींच्याच गावातून … Read more

खोटं न बोलता गांधी वकील झालेच कसे? जाणून घ्या

images

वकिलीच्या धंद्यात खोटे बोलल्याशिवाय चालायचेच नाही असे गांधीजींनी विद्यार्थीदशेत असतानाच ऐकलं होतं. पण त्यांना खोटं बोलून प्रतिष्ठाही मिळवायची नव्हती आणि धनही कमवायचे नव्हते.

‘या’ कारणामुळे महात्मा गांधी पत्रकारितेकडे वळले

Mahatma Gandhi as a Journalist

महात्मा गांधी जयंतीविशेष | अनु बंदोपाध्याय इंग्लंडला गेल्यावरच गांधी वर्तमानपत्राचे नियमीत वाचक झाले. भारतात असताना शालेय जीवनात त्यांनी कधी वर्तमानपत्र वाचण्यात रस घेतला नव्हता. त्यात ते इतके लाजाळू स्वभावाचे होते की ३-४ लोकांच्या समुहात सुद्धा काही बोलताना त्यांचे तत-पप व्हायचे. वयाच्या २१ व्या वर्षी गांधींनी ‘वेजिटेरिअन’ नावाच्या एका इंग्रजी मासिकासाठी नऊ लेख लिहीले. गांधींचं मासिकासाठीचं … Read more