मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांना फक्त राजकारण करायचं- शरद पवार

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर स्थगितीचा निर्णय दिल्यापासून विरोधकांनी ठाकरे सरकाराला घेरलं आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणा वर बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडलं असल्याचे विरोधकांचं म्हणणं आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘मराठा आरक्षण प्रकरणी आम्हाला राजकारण करायचं नाही असं सांगताना शरद पवार यांनी … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाविरोधात, लातूरमध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर । मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या लातूरमधील एका उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. चाकूर तहसील कार्यालयासमोर विषारी औषध पिऊन त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. किशोर गिरीधर कदम असे या युवकाचे नाव आहे. या युवकाला लातूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती चाकूरचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी … Read more

मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत केली ‘ही’ वाढ

मुंबई । एकीकडे अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवण्याची मागणी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ केली आहे.मराठा आरक्षणाबरोबर मराठा समाजातील इतर प्रश्न हाताळण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीकडे मिळाले आहे. मराठा आरक्षण मुद्द्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना उपसमितीवरुन हटवण्याची … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाना १० लाख रुपये, सरकारी नोकरी देणार

मुंबई । मराठा क्रांती आंदोलनात ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि नोकरी देण्याचा निर्णय मागच्या ठाकरे सरकारने घेतला होता. काल बुधवारी १२ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या निर्णयानंतर … Read more

विनायक मेटेंच्या ‘त्या’ मागणीवर काँगेस संतापली; केला जोरदार पलटवार

मुंबई । मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवून एकनाथ शिंदे किंवा दुसऱ्या सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी विनायक मेटेंनी यांनी केली आहे. विनायक मेटेंच्या मागणीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार पलटवार केलाय. सचिन सावंत यांनी ट्विटवर विनायक मेटेंचा चांगलाच समाचार घेतला. सचिन स्वतः म्हणाले कि, ‘मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी झाली. पाच न्यायाधीशांच्या खंठपीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी यावेळी केली असून व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे म्हणणं मांडण्यास अडचणी येत असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. तसेच सुनावणीपर्यंत नोकर भरतीला स्थगिती दिली असून याचिकांवर १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय आज घेतला आहे. मराठा … Read more

‘सारथी’ला बंद करून दाखवाच! मग बघतो; नितेश राणेंचा मंत्र्याला धमकीवजा इशारा

मुंबई । सारथी संस्थेच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादात भाजप आमदार नितेश राणे यांनी उडी घेतली आहे. सारथी संस्था बंद केल्यास राज्यातील मंत्र्यांना नव्या गाडीतून महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा धमकीवजा इशारा राणे यांनी दिला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. राणे यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार … Read more

मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नका- खा. छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर । मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही, अशा शब्दात भाजप खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना त्यांचं नाव न घेता सुनावले आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी यांनी ट्विट करून सारथी संस्थेच्या वादावर भाष्य केलं आहे. … Read more

मराठा आरक्षणाचे विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर

मुंबई । मराठा आरक्षणाचे विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. येत्या ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात नियोजित असलेल्या सुनावणीच्या तयारीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल, असे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितले. … Read more

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदारकीचा राजीनामा देणारा राष्ट्रवादी आमदार भाजपच्या वाटेवर

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला . अद्यापही पक्षाची गळती सुरूच आहे . आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारकीचा राजीनामा दिलेले भाऊसाहेब पाटील चिकटगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . चिकटगावकर हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यामध्ये अनेक आमदारांनी राजीनामे दिले … Read more