मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटणार ! 4 धरणे तर एक बंधारा तुडुंब

Koyana Dam

औरंगाबाद – मराठवाड्यातील एकूण धरणांपैकी चार धरणांमध्ये 100 टक्के जलसाठा झाला आहे. तर जायकवाडी धरणात 56 टक्के जलसाठा असून खडका बंधारा शंभर टक्के भरल्याने तो आता ओसंडून वाहत आहे. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्याला अति मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे बहुतांश धरणे भरली आहेत. यामुळे यावर्षी मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत … Read more

शहरातील 43 केंद्रांवर पार पडली ‘नीट’ परीक्षा

औरंगाबाद – वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट (नीट) ची परीक्षा रविवारी काल पार पडली. या परीक्षेसाठी देशभरातून 15 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते तर औरंगाबादेत 43 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला शहरात बुलढाणा, बीड, परभणी, जालना आदी जिल्यांतून परीक्षार्थी आले होते. वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट परीक्षेसाठी शहरातून … Read more

धक्कादायक ! मॉर्निग वॉकला गेलेल्या ४ जणांना अज्ञात वाहनाने चिरडले

Accident

परभणी – मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना अज्ञात वाहनानं चिरडल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. यामधील दोन जणांचा मृत्यू झालाय. तर दोघांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळावर पोहचले. पोलिस पुढील तपास करत आहेत. परभणीमधील मानवत तालुक्यातील केकरजवळा येथे रविवारी … Read more

मराठवाड्यातील शाळांचे रुपडे पालटणार ! शाळांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी सरकारकडून 200 कोटी

औरंगाबाद – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी महत्वाची योजना जाहीर केली आहे. स्वराज्यजननी, माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांतून प्रेरणा घेत ‘राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान’ हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ही योजना प्रामुख्यानं मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्तीस प्राधान्य देणारी आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट द्वारे … Read more

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार ! नदी- नाल्यांना पूर तर अनेक गावांचा संपर्क तुटला

Heavy Rain

औरंगाबाद – मागील 24 तासांपासून संपूर्ण मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक ठिकाणी जनावरे वाहून जाणे, पूल कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मराठवाड्याची तहान भागवणारे येलदरी धरण 95 टक्के भरले असून, जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबादेत देखील … Read more

विजेचा शोक लागून दोन भावांचा जागीच मृत्यू; गावावर शोककळा

death

जालना – जनावरांसाठी कुट्टी मशीनमधून चारा बारीक करीत असताना अचानक विजेचा जोरदार शॉक लागल्याने दोन चुलत भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जिल्यातील भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. पवन गजानन घोडे (22), सचिन रामकीसन घोडे (23) असे या घटनेत मयत झालेल्या भावांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी … Read more

मराठवाड्याशी संबंधित सर्व कार्यालये औरंगाबादेत आणण्यासाठी पाठपुरावा करणार – केंद्रीय मंत्री भागवत कराड

Dr. bhagavat karad

औरंगाबाद – मराठवाड्याशी संबंधित जलसंपदा विभागाच्या कार्यालयाचे नियंत्रण नाशिक इथून केले जाते. कामकाजाच्यादृष्टीने सोयीचे व्हावे यासाठी मराठवाड्याशी संबंधित नाशिक येथे असलेली तीन कार्यालयांचे नियंत्रण औरंगाबादमधून करता यावे यासाठी पाठपुरावा करणार आहे. तीन कार्यालयांपैकी केंद्र सरकारच्या अख्त्यारित असलेले कार्यालय औरंगाबादला आणले जाईल तर राज्य सरकारच्या अख्त्यारित असलेले कार्यालयांचे नियंत्रण मराठवाड्याकडे द्यावे यासाठी राज्य सरकारच्या जलसंपदामंत्री तसेच … Read more

औरंगाबादेत होणार 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन

marathi sahitya

औरंगाबाद – मागील वर्षी होणारे 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन कोरोनाच्या प्रभावामुळे स्थगित करावे लागले होते. नंतर बराच काळ वाट पाहून अखेर ते रद्द करण्यात आले होते. मागील वर्षी ते नांदेड जिल्यातील देगलूर येथे होणार होते. आता 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन 25 व 26 सप्टेंबर 2021 रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्याचे ठरले आहे. मराठवाड्यातील … Read more

सख्खा भाऊ पक्का वैरी ! सख्ख्या भावाने सख्ख्या भावाचा केला खून

Murder

बीड – सख्खा भाऊ पक्का वैरी हि म्हण सर्वत्र प्रसिद्ध आहे. याच म्हणीला सार्थ ठरविणारी एक घटना बीड जिल्यातील माजलगाव तालुक्यात घडली आहे. आईच्या मानेवर विळा मारणा-या मुलाची आत्महत्या नसुन खुनच असल्याचे निष्पन्न झाले असुन सख्या भावाने सख्या भावाचा खुन केल्याची घटना तालुक्यातील मालीपारगाव येथे घडली असुन वडील मच्छिंद्र अंबादास कदम यांच्या फिर्यादीवरून लहान मुलगा … Read more

नांदेडात खळबळ ! मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक

Ashok chavhan

नांदेड – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात साईसदन हे अशोक चव्हाण यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाला सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो. असे असतानाही ही दगडफेकीची घटना घडली आहे. एका अज्ञात महिलेने ही दगडफेक केल्याची … Read more