धक्कादायक ! अवघ्या दहा मिनिटांत लॅबच्या रिपोर्टमध्ये केला बदल

Corona

औरंगाबाद – कोरोना व अन्य आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येत रक्त, लघवी व अन्य तपासणीच्या नावाखाली पॅथॉलॉजी लॅबनी लातूर जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कुठे पॅथॉलॉजिस्ट कोऱ्या लेटरपॅडवर स्वाक्षरी करून निघून जातात तर कुठे त्यांची स्वाक्षरी रिपोर्ट तयार करणाराच करतो. संगणकीय प्रयोगशाळेत तर पॅथॉलॉजिस्टची स्वाक्षरी स्कॅन करूनच ठेवली जाते. या गोंधळात एका महिला रुग्णाचा दिलेला अहवाल लॅबने … Read more

‘ऑनलाईन शिक्षणापेक्षा देशी दारू दुकानाचा परवाना द्या’; विद्यार्थ्यांची उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद – ऑनलाइन शिक्षण घेऊन बोगस पदवी मिळणार असेल तर त्याऐवजी देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात शिक्षण घेत असणारा विद्यार्थी पवन जगडमवार याने uuu मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याने हे पत्र पाठवलं आहे. “ऑनलाइन शिक्षण लादले जात आहे. ऑनलाइन वर्गात … Read more

अजूनही होतोय जातीभेद ? दलित असल्याने नाकारले घर, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

औरंगाबाद – पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना चळवळीचे केंद्र असलेल्या औरंगाबादेत घडली आहे. उच्च न्यायालयातील एका वकिलाला दलित असल्याने घर नाकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. प्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पाच जणांविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उच्च न्यायालयात वकिली करणारे … Read more

आमदार रत्नाकर गुट्टेंची 255 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त

ED

औरंगाबाद – 635 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असलेले रासपचे गंगाखेड चे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी संबंधित कंपन्यांची 255 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतली आहे. 2020 मध्ये या मालमत्तेवर टाच आणली होती. आमदार गुट्टे यांनी गरीब शेतकऱ्यांच्या नावाने कृषी कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवण्याचा आरोप आहे. … Read more

मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट

rain

औरंगाबाद – मराजवाड्यातील काही भागात गारपीट व अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. आज लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील घरणी, आष्टा शिवारात पहाटे साडेचार वाजता अचानकपणे जोरदार वारे वाहू लागले. यावेळी सुमारे अर्धा ते पाऊणतास मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला तर काही वेळातच गारा ही पडल्या. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील अनेक शेतकऱ्यांची उभी ज्वारी भुईसपाट … Read more

वर्षभरात मराठवाड्यात 887 शेतकऱ्यांनी संपविले जीवन

Farmer waiting for Rain

औरंगाबाद – शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, त्यानंतरही मराठवाड्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहेत र्षभरात 887 शेतकऱ्यांनी विविध कारणाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 210 आत्महत्या बीड जिल्ह्यात तर सर्वात कमी 36 आत्महत्या हिंगोली जिल्ह्यात झाल्याची नोंद आहे. यापैकी 681 शेतकर्‍यांना शासनाकडून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. … Read more

केंद्रीय मंत्र्याचा ‘असाही’ साधेपणा ! भर रस्त्यात गाडी थांबवून साधला गावकऱ्यांशी ‘संवाद’

औरंगाबाद – आपल्या साधेपणा रांगडेपणासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ओळखले जातात. अनेकांनी ते बोलताना आपले वाटत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी रस्त्यावर बसून जेवण केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आज सकाळी मुंबईहून रावसाहेब दानवे रेल्वेने जालन्याला पोहोचले. भोकरदनला जात असताना त्यांनी रस्त्यात गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. या प्रसंगी त्यांच्या … Read more

थरारक ! जेव्हा धावती ‘मोपेड’ अचानक पेट घेते…

औरंगाबाद – सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बीड जिल्ह्यातील गेवराईजवळ बायपासवर एका धावत्या मोपेडने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखून नागरिकांनी तातडीने मदत केल्याने तरुण थोडक्यात बचावला. वडवणी तालुक्यातील पुसरा येथील पंकज अंगद पवार (27) आज दुपारी अहमदनगरहून शेवगावमार्गे गेवराईकडे येत आपल्या मोपेडवरून येत होता. शहराजवळच्या बायपासवर सायंकाळी 5 वाजेच्या … Read more

मरणानंतरही यातनाच ! अंत्यविधीला जागाच नसल्याने मृतदेह आणले थेट तहसीलला

बीड – जिल्ह्यातील केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील एका वृद्ध महिलेचे मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. तिचा अंत्यविधी करण्यासाठी गावात मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने नेमका अंत्यविधी कुठे करावा ? या अडचणीने संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी त्या महिलेचा मृतदेह बुधवार तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. तालुक्यातील सोनेसांगवी येथील वृद्ध महिला … Read more

जालन्यात दंगल; परंतू पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

जालना – शहरातील टांगा स्टँड येथे जुन्या वादातून दोन टोळक्यात हाणामारी सुरू झाली. मात्र काही वेळातच या हाणामारीने दंगलीचे स्वरूप घेतले. यात एक जण गंभीर जखमी झाला. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती वेळीच आटोक्यात आणत बाजारपेठ पुन्हा सुरू झाली. टांगा स्टँड येथ दोन जणांमध्ये जुन्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर दंगलीत झाले. दोन … Read more