धक्कादायक! श्रमिक रेल्वेमध्ये आतापर्यंत ८० मजुरांचा मृत्यू

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे काळात अडकून पडलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी चालवण्यात आलेल्या श्रमिक रेल्वेमध्ये जवळपास ८० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतं आहे. १ मे ते २७ मे पर्यंत तब्बल ३८४० विशेष रेल्वे चालवण्यात आल्या. याद्वारे जवळपास ५० लाख स्थलांतरीत मजूर आपल्या घरी पोहचले. परंतु, श्रमिक रेल्वेने घरी निघालेल्या जवळपास ८० मजुरांचा त्याच्या … Read more

मजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच हजार रुपये घेऊन आला होता

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अचानक लॉकडाऊन करण्यात आलं. यामुळे असंख्य मजुरांची गैरसोय झाली. हाताचे काम गेले. उपासमारीची वेळ आली. घरी जाण्याचे रस्ते बंद झाले. अशा संकटाच्या परिस्थितीत सोनू सूद मजुरांच्या मदतीला धावून आला. सोनूने या मजुरांची अडचण ओळखत त्यांना बसने त्यांच्या गावी पाठवायला गेल्या काही … Read more

अशाप्रकारे सेहवागने सुरु केले स्थलांतरित मजूरांसाठी ‘घर से सेवा’ अभियान

नवी दिल्ली । कोरोनाच्या साथीनं निर्माण झालेल्या परिस्थितीत देशभरात विविध ठिकाणी अडकलेले आहेत. लॉकडाउनमूळ काम ठप्प आहे. त्यामुळे अनेकांचे हातचे काम गेले आहे. अशा बिकट परिस्थितीत मजुरांवर उपासमारीचेही वेळ आली आहे. अशा मजूरांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी, तसेच इतर काही जण वैयक्तिक पातळीवर जमेल तशी मजूरांना मदत करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू … Read more

फडणवीसांचा ‘तो’ दावा आव्हाडांनी ठरवला खोटा, म्हणाले ‘हा’ घ्या पुरावा

मुंबई । महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थलांतरित मजुरांचा खर्च केंद्र सरकारनं उचलला असल्याचा दावा पत्रकार परिषदेतून केला होता. त्यानंतर राज्य सरकारनं पत्रकार परिषद घेऊन सर्व खर्च राज्यानं केल्याचं म्हटलं होतं. हा सगळा वाद सुरू असताना स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून स्यू मोटू … Read more

राज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..

मुंबई । सध्या सोशल मीडियावर स्थलांतरित मजुरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अभिनेता सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मजूर आणि कामगारांना त्यांच्या  घरी पोहोचवण्याच्या सोनूच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. आज स्थलांतराची मजुरांसाठी तो मसीहा बनला आहे. उत्तर प्रेदश, बिहार, कर्नाटक येथील हजारो मजूर आणि श्रमिकांनी त्यानं स्वखर्चानं बसची सोय करून घरी सुखरुप पोहोचवलं आहे. त्याच्या … Read more

मजुरांच्या जेवण्याचा आणि त्यांच्या तिकीटांचा खर्च राज्यांनी करावा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली । कोरोना संकटात स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. हातच काम गेल्यानं अनेकांनी घरची वाट धरली आहे. मात्र, घरी जाण्यासाठी पैशाअभावी आणि सरकारी प्रक्रियांमध्ये अडचणीत सापडलेल्या मजुरांचे हाल होत आहे. याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली असून या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. स्थलांतरीत मजुरांच्या जेवण्याचा आणि त्यांच्या तिकीटांचा खर्च राज्यांनी करावा, असे … Read more

स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नावरून मेधा पाटकरांनी ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दरवाजे

नवी दिल्ली । कोरोना संकटात स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. हातच काम गेल्यानं अनेकांनी घरची वाट धरली आहे. मात्र, घरी जाण्यासाठी पैशाअभावी आणि सरकारी प्रक्रियांमध्ये अडचणीत सापडलेल्या मजुरांचे हाल होत आहे. स्थलांतरीत मजुरांची सद्य परिस्थिती पाहून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मेधा पाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयात स्थलांतरीत मजुरांच्या … Read more

धक्कादायक !! साताऱ्यातील हिंदुस्थान फीड्स कंपनीत २०० हून अधिक मजुरांना कोंडले; घरी जाण्यासाठी मजुरांचा आक्रोश

चांगला पगार घेणारे अनेक लोक लॉकडाऊन सुरु झाला की घरी बसले, ५०-६० लोक पळूनसुद्धा गेले, मात्र कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही थोडावेळ थांबलो, कळ काढली. पण कंपनीसाठी कुत्र्यागत राबूनसुद्धा आम्हाला हीन दर्जाची वागणूक मिळणार असेल तर आम्हाला ही कंपनी नको आणि हे कामसुद्धा नको. आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी कोंडण्यात आलं असून तात्काळ आमची सुटका करावी अशी मागणी या कामगारांनी केली आहे.

जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येताना… राज यांचे योगींना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई । यापुढे महाराष्ट्राला किंवा इतर राज्यांना उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. योगी यांनी या नव्या नियमांसंदर्भातील माहिती पत्रकारांशी बोलताना दिली होती. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे योगी आदित्यनाथ यांना आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले … Read more

Video: राहुल गांधींनी घेतली गावी निघालेल्या मजुरांची भेट; व्हिडिओ वायरल

नवी दिल्ली । लॉकडाउनमध्ये स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवणारे कांग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी स्थलांतरित मजुरांचे दु:ख जाणून घेतले. याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केला. आज सकाळी ९ वाजता शेअर केला. या व्हिडिओत मजुरांनी आपल्याला येत असलेल्या अडचणी राहुल गांधी यांना सांगितल्या. हे स्थलांतरित मजूर ७०० किमीचा प्रवास पायी करत … Read more