राज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सध्या सोशल मीडियावर स्थलांतरित मजुरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अभिनेता सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मजूर आणि कामगारांना त्यांच्या  घरी पोहोचवण्याच्या सोनूच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. आज स्थलांतराची मजुरांसाठी तो मसीहा बनला आहे. उत्तर प्रेदश, बिहार, कर्नाटक येथील हजारो मजूर आणि श्रमिकांनी त्यानं स्वखर्चानं बसची सोय करून घरी सुखरुप पोहोचवलं आहे. त्याच्या याच कामाचं राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फोन करून कौतुक केलं आहे.

राज्यपालांनी सोनूला फोन केल्यानंतर त्याच्या ट्विटरवर यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. राज्यपपाल कोश्यारी यांच्या ट्विटला उत्तर देताना सोनूनं त्यांचे आभार मानत तुम्ही केलेल्या कौतुकामुळं काम करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. दरम्यान, मजूरांना घरी पाठवण्याच्या उपयोजनांवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरू असले तरी राजकीय नेत्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्याला ‘नायक’म्हटलं आहे. तर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी देखील त्याला सलाम ठोकला आहे.

गेले काही दिवस सोनू रोज सुमारे १८ तासांहून अधिक काळ तो फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदत करण्यात व्यग्र असतो. परंतु, अशा परिस्थितीतही परवानगी मिळण्यात काही प्रमाणात अडचणी येत असल्याचं तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो. बसमधून श्रमिकांना पाठवताना सुरक्षितत्याचे नियम तो पाळतो. आसनक्षमता ६० असलेल्या बसमधून तो ३५ प्रवाशांना पाठवतो. या प्रवाशांच्या जेवण-खाण्याची व्यवस्थाही तो करतो आहे. सोनूची मैत्रीण निती गोयलच्या बरोबरीनं त्याने मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली आणि त्यामुळे तो सर्वांसाठी त्यांचा लाडका सुपरहिरो बनला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment